Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाश्रीमंत वाद्य पाथकाचा सातवा वर्धापन दिन थाटामाटात साजरा…

श्रीमंत वाद्य पाथकाचा सातवा वर्धापन दिन थाटामाटात साजरा…

लोणावळा (प्रतिनिधी): भांगरवाडी येथील श्रीमंत वाद्य पथकाचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महिला मंडळ सभागृहात सदरचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर स्थानी मिलिंददादा नंदूकुमार (बाबुजी) वाळंज व सागरदादा वाळंज उपस्थित होते.
आपल्या अप्रतिम वाद्य कला कौशल्यातून श्रीमंत वाद्य पथकाने लोणावळ्यात सर्वांची मनं जिंकली आहेत. अशा या भांगरवाडी येथील श्रीमंत वाद्य पथकाला सात वर्ष पूर्ण झाली असल्याने सातवा वर्धापन दिन मोठया थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मिलिंददादा वाळंज, सागरदादा वाळंज यांनी पथकाच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा व सदिच्या दिल्या.यावेळी श्रीमंत वाद्य परिवारातील सर्व वादक व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page