Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" श्रीराम लल्लाच्या " प्राण प्रतिष्ठा निमित्ताने कर्जत नाक्यावरील व्यापारी व रिक्षा...

” श्रीराम लल्लाच्या ” प्राण प्रतिष्ठा निमित्ताने कर्जत नाक्यावरील व्यापारी व रिक्षा संघटनेतर्फे अन्नदान वाटप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) तिर्थक्षेत्र जन्मभूमी आयोध्येत होत असलेल्या ” प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा ” या ऐतिहासिक आणि पवित्र क्षणाचे औचित्य साधून या मंगलदिनी कर्जत मध्ये रेल्वे स्थानकाच्या बाहेरील नाक्यावर असलेल्या व्यापार संघटनेने व जय मल्हार तीन चाकी रिक्षा संघटनेच्या वतीने ” श्रीराम लल्ला ” मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा – आरती करून आलेल्या श्रीराम भक्तांना मसाले भात – बुंदी – गुलाबजाम – फरसाण – जिलेबी व थंड कोल्ड्रिंक्स चे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी येथे अनेकांनी भक्ती भावाने ” श्रीरामाचे ” दर्शन घेवून अन्नदानाचा प्रसाद रुपी लाभ घेतला .यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष – रामसिंग लोवंशी , उपाध्यक्ष – सुभाष लोवंशी, खजिनदार – सुमित लोवंशी, उप खजिनदार – रामनिवास लोवंशी , त्याचप्रमाणे विजय लस्सीवाले , विजय बडेकर , नारळ पाणीवाले विजय वर्मा , जयंता पाटकर , वडेवाले संदिप शिंदे , सुरेश शहा , अभिषेक लोवंशी , पवन लोवंशी , सुहास गावडे , गणेश गुप्ता , बाळू लोवंशी , रिक्षावाले राहुल बनकर , जय मल्हार रिक्षा स्टँड संघटनेचे रिक्षा धारक , त्याचप्रमाणे अनेक व्यापारी , रेल्वे रिक्षा स्टँड मधील रिक्षा चालक मालक , आदिवासी धंदेवाले या उत्सवात सामील होवून उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page