Sunday, June 1, 2025
Homeपुणेलोणावळाश्री एकविरा गडावरती चैत्र उस्तव निमित्त जिल्हा अधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध लागू..

श्री एकविरा गडावरती चैत्र उस्तव निमित्त जिल्हा अधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध लागू..

कार्ला : श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 2025 च्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र दुडी यांनी 30 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 6 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशान्वये वरील कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे, ढोल, ताशे, वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी करण्यात आली आहे. एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्ला लेणी य परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविने अथवा विद्रुपीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
आदेशाचे उघन केल्यास संबंधित व्यकी भारतीय दंड विपान संहिता कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यातील वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 4 एप्रिल रोजी सुरू होत असून या कालावधीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जड, अवजड वाहतुकीवर काही निर्बंध घालून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी जारी केले आहेत.
नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन दुडी यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page