Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळश्री एकविरा देवस्थान चा कारभार नवनिर्वाचित विश्वसतांकडे सुपूर्द…

श्री एकविरा देवस्थान चा कारभार नवनिर्वाचित विश्वसतांकडे सुपूर्द…

कार्ला : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चा ताबा हा त्रिसदस्सीय प्रशासकीय समितीकडे सोपविण्यात आला होता. आज अखेर मुंबई हायकोर्ट चे अधिकारी सुहास परांजपे यांच्या समवेत हा ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या दि. 04/09/2018 रोजीच्या निकालानुसार दि. 05/09/2018 पासुन आज पर्यंत श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे होता. त्यामुळे नवनिर्वाचित विश्वस्त नवनाथ रामचंद्र देशमुख यांनी सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने मुंबई हायकोर्ट येथे रिट याचिका नंबर 5243/2018 व अँप्लिकेशन नंबर 12906/2023 दाखल केली होती.
त्यानुसार उच्च न्यायालयाने दि. 19/12/2023 रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेला ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा असा निकाल देण्यात आला. त्या आदेशानुसार आज दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वडगाव येथे त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती च्या अध्यक्षा श्रीमती सी.आर.उमरेडकर, सचिव तहसीलदार विक्रम देशमुख व सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर.परदेशी व नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे मारुती रामचंद्र देशमुख, संजय बाळकृष्ण गोविलकर,नवनाथ रामचंद्र देशमुख,सागर मोहन देवकर,विकास काशिनाथ पडवळ,महेंद्र अशोक देशमुख आणि मुंबई हायकोर्ट चे अधिकारी सुहास परांजपे अशी संयुक्त मीटिंग घेण्यात आली.सदर मीटिंगमध्ये श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चा ताबा मुंबई हायकोर्टचे अधिकारी सुहास परांजपे यांच्या समवेत नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आला.
त्यानंतर प्रशासकीय समिती, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ व परांजपे साहेब हे सर्व आई एकविरा गडावर दर्शनास व राहिलेला ताबा घेण्यासाठी गेले व त्या ठिकाणी राहिलेला ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे कागदोपत्री सुपूर्त करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page