लोणावळा : श्री महर्षी वाल्मिकी समाज लोणावळा शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर. नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र मातंग समाज लोणावळ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री महर्षी वाल्मिकी समाज लोणावळा शहराध्यक्ष पदी विक्रम विनोद सारवान व उपाध्यक्ष पदी अनिल ( विक्की ) अर्जुन उठवाल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे,,,अध्यक्ष पदी विक्रम सारवान, उपाध्यक्ष पदी राजेश तेजी, विक्की उठवाल, कार्याध्यक्ष पदी शाम वाल्मिकी, हेमंत चव्हाण तर सचिव पदी मंगेश खरारे, सहसचिव पदी विनोद उठवाल तसेच कोषाध्यक्ष पदी गौतम कुडिया व अक्षय चव्हाण यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदावर राजेश जेधे, सागर पंडित, शेखर चव्हाण, कुणाल चव्हाण, गोपाळ डागोर, संतोष टाक, गणेश वाल्मिकी, दिनेश रानवे, कुंदन धरी व आकाश धोरपीया इत्यादींची नियुक्ती करण्यात आली आहे.
मातंग समाज लोणावळा शहर कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.