(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
” एकदा रक्तदान – देईल तिघांना जीवनदान ” या राष्ट्र स्फूर्ती वाक्याचे बोध घेऊन ग्रिनिज बुक ऑफ इंडिया या वर्ल्ड बुकात नोंद घेण्याजोगे कार्य करून कर्जतमधील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर यांनी कर्जत तालुक्याचे नाव सातासमुद्रापार नेले असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
कर्जत – खालापूर तालुक्यातील सर्व मंडळ , संघटना , राजकीय पक्ष , शैक्षणिक , धार्मिक संस्था , व्यापारी क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे असलेले राजाभाऊंनी रक्तदान हेच श्रेष्ठदान असून हे राष्ट्रव्यापी सेवा असल्याचे प्रचार – प्रसार केल्यानेच आज कर्जत – खालापूर तालुक्यातील ४३२ वे व कोरोना काळातील ४० वे रक्तदान शिबिर आज श्री महाराणा प्रताप मित्र मंडळ , मोठे वेणगाव व दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कै.प्रितेश हरिश्चंद शिंदे यांच्या स्मरणार्थ , व समर्पण रक्तपेढी – घाटकोपर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी विठ्ठल मंदिर मोठे वेणगाव,कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले . या रक्तदान शिबिराचे उदघाटन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर व ज्येष्ठ पत्रकार विजुभाऊ मांडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.या प्रसंगी रमेश मुंडे ,रंजन दातार , सुधाकरशेट घारे, सुनील घरत , गणेश पालकर, गणेश मुंडे , मोहीली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रीती करवंदे , अजय चव्हाण,अभिषेक गायकर,व श्री महाराणा प्रताप मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मोठे वेणगाव येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढी च्या सर्व डॉक्टर, टेक्निशियन व इतर कर्मचा-यांनी रक्त संकलनाचे काम केले . हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री महाराणा प्रताप मित्र मंडळ , मोठे वेणगांवचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले , त्याबद्दल वरील सर्वांचे सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर व दैनिक लोकमतचे पत्रकार विजुभाऊ मांडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.