लोणावळा : श्री राम नवमी निमित्त गवळीवाडा लोणावळा येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र भगवान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .
दुपारी साडेबारा वाजता राम जन्माची कथा सांगण्यात आली,यानंतर महिलांनी राम जन्माचा पाळणा म्हणत श्रीराम जन्माचे स्वागत केले . श्रीराम नवमी उत्सव सोहळ्या निमित्त श्रीराम नवमी उत्सव गवळीवाडा लोणावळा यांनी गुढीपाडवा,पाडवा ते राम नवमी पर्यंत दररोज मंदिरासमोर सकाळी रामरक्षा व रामनाम जप , गवळीवाडा प्रिमियर लिग ही क्रिकेट स्पर्धा , अभिषेक दिन उत्सव अभिषेक , भजन , चक्रीभजन , भव्य बैलगाडा स्पर्धा , श्रीराम जन्मोत्सवानिमित्त होमहवन , जन्मोत्सव सोहळा , सायंकाळी छबिना मिरवणूक , सोमवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा झाली नव्हती या वर्षी मात्र पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठया संख्येने याठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच सायंकाळी आमदार सुनील शेळके यांनी देखील या उत्सवात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत छबीना मिरवणूक अगदी उत्साहात संपन्न झाली.