Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळाश्री संत बाळूमामा जन्मोत्सव आनंदात व भक्तिमय वातावरणात संपन्न...

श्री संत बाळूमामा जन्मोत्सव आनंदात व भक्तिमय वातावरणात संपन्न…

मावळ (प्रतिनिधी): श्री संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा 2022 निमित्त धनगर वस्ती पांगोळी येथील श्री संत बाळूमामा मंदिरात विविध धर्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार दि.7 रोजी धनगर वस्ती पांगोळी येथील श्री संत बाळूमामा मंदिरात सालाबादप्रमाणे सकाळपासून श्रींचा दुग्ध अभिषेक, श्रींची आरती, सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम, पाळणा, सायंकाळी श्रींची आरती व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मुख्य विश्वस्त बबन खरात व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त सिद्धेश्वर प्रसाद भजनी मंडळ तुंगार्ली, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ भांगरवाडी व यशवंत भजनी मंडळ कातवी यांच्या सुश्राव्य भजनाने सदर जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास भक्तिमय वातावरण निर्माण झाले तसेच पाळणा या कार्यक्रमात महिलांनी पाळणा गाऊन आनंद लुटाला.
बाळूमामा देवस्थान मुख्य पुजारी बाळू जानकर यांच्या हस्ते श्रींची पूजा अर्चा करून सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली. सदर जन्मोत्सव सोहळ्यात महिला ग्रामस्थ व लहानांनी बाळूमामाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्री संत बाळूमामा जन्मोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्य विश्वस्त बबन खरात, शंकर बाळू हिरवे, राजू जानकर, पांडू जानकर, संतोष खरात, शंकर जानकर, बाबुराव मरगळे, गंगाराम मरगळे, नगरसेविका कल्पना झोरे, नंदा तांदळे, संतोष हिरवे, रमेश खरात, मारुती जानकर, राजू हिरवे, शिवाजी गरुड, शांताराम खरात, रामा होले, मनू होले, अशोक मेंघाळ, हरी चौधरी, सागर शिंदे, आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page