Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळाश्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची 673 व्या पुण्यतिथी निमित्त लोणावळ्यात विविध कार्यक्रमाचे...

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची 673 व्या पुण्यतिथी निमित्त लोणावळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन..

लोणावळा (प्रतिनिधी):श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.15 जुलै रोजी श्री लक्ष्मी नारायण गणपती मंदिर, भांगरवाडी येथे करण्यात आले.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी औचित्य साधून सत्यनारायण पूजा, मुलांचे खेळ, व मनाचे श्लोक, मनाचे श्लोक, भीमरूपी महारूद्र,रामरक्षा स्तोत्र,अथर्वशीर्ष तसेच सायंकाळी आळंदी देवाची येथील ह.भ.प.व ज्ञानदा संस्कृत पुणे प्रबोधिनी प्रवर्तक डॉ. गोरक्षनाथ महाराज उदागे यांचे प्रवचन तर गुणवंत विध्यार्थ्यांनाचा सन्मान करण्यात आला नंतर रात्री महाप्रसाद भंडाऱ्याने पुण्यतिथी समारंभाचा समारोप मोठया उत्सहात संपन्न झाला.

यावेळी शिंपी समाजाचे ज्येष्ठ सदस्य नामदेव खर्डे, श्रीमती खर्डे ,धीरूभाई कल्याणजी , उदय सरवदे ,श्रीमती रेखा मुळे , श्रीमती भारती कविटकर, सौ.बारटक्के, श्रीमती मीरा चिंबळकर ,व कार्यकर्ता सदस्य जीतुभाई कल्याणजी, उमेश जुन्नरकर,महेश कांबळे, अमोल धोंगडे,नरेंद्र दानवे आदींसह महिला आणि विध्यार्थी मोठया संख्येने समारंभास उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page