मावळ प्रतिनिधी):नेसावे गावातून एका जखमी सांबर हरीणला ग्रामस्थ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कढून जीवदान देण्यात आले. 27 जानेवारी रोजी दुपारी एक सांबर श्वानांन च्या हल्यात जखमी झाले होते. याची माहिती किरण शिरसट यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व सदस्य चंद्रकांत बोंबले यांना दिली. वेळ न घालवता वनविभाग शिरोता चे वनरक्षक चव्हाण आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सदस्य चंद्रकांत बोंबले आणि जिगर सोलंकी नेसावे गावात पोहचले आणि सांबरास रेस्क्यू केले.
प्राथमिक पाहणी केली त्यात थोडी जखम दिसून आली. वनविभाग शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदरशनाखाली जखमी सांबराला पुणे रेस्क्यू सेंटर इथे पाठवण्यात आले.
यावेळी विशाल शिरसट,अनिल शिरसट, रामदास शिरसट, भरत शिरसट,दत्ता शिरसट, गुलाब शिरसट, सूरज शिरसट, सागर शिरसट या स्थानिक ग्रामस्थांचे खूप महत्वाचे सहकार्य लाभले.
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागाला (1926) नंबर वर संपर्क करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.