मलवली : भाजे संपर्क संस्थेच्या विविध प्रकल्पांना बऊर इक्विपमेंट इंडिया कंपनीने सीएसआर फंडातून भरीव सहकार्य दिले आहे. या मदतीत संस्थेच्या लिली इंग्लिश मीडियम स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेसाठी प्रयोगशाळा साहित्य, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी यंत्रसामग्री तसेच भाजे बालग्राममधील मुलींच्या वसतिगृह ‘शारदा सदन’ व ‘आशियाना सदन’चे नूतनीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेश नंदी, संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, विश्वस्त रत्ना बॅनर्जी, वरिष्ठ प्रकल्प सल्लागार नवनिता चटर्जी, रेंटल व प्रोडक्शन व्यवस्थापक राजेंद्रसिंह राठोड, मनुष्यबळ विभाग प्रमुख सुहासिनी दास, वरिष्ठ व्यवस्थापक सेवा निर्मल दिनकर, वरिष्ठ व्यवस्थापक रेंटल जसपाल सिंग, विक्री व्यवस्थापक योगेश तिडके, लेखा अधिकारी अनिरुद्ध वाघमारे, मनुष्यबळ व्यवस्थापक अमोल साखरे, उपव्यवस्थापक विपुल गाडी तसेच संपर्क संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिमेश नंदी म्हणाले , “विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. संपर्क संस्थेला केलेली ही मदत ही केवळ सुरुवात असून भविष्यातही मोठ्या प्रकल्पांसाठी सहकार्य सुरू राहील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश माळी, चेतन देशमुख, योगेंद्र कुलकर्णी, विंद्या बापट, शुभंकर शाह, सुभाष बोगार्डे आणि समाधान मोहोराय यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार नवनीत चटर्जी यांनी मानले.