Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" संविधान सन्मान महारॅलीत " सर्व बहुजन वर्गाने सामील व्हा !

” संविधान सन्मान महारॅलीत ” सर्व बहुजन वर्गाने सामील व्हा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारत वासीयांना संविधानाच्या माध्यमातून समता – स्वातंत्र्य – न्याय – हक्क , तसेच हजारो अधिकार बहाल केले . महिलांना देखील चूल व मूल च्या उंबरठ्यातून बाहेर काढले , अंधकारमय जुन्या चालीरीती मोडून गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारे संविधानाचे महत्व व त्याचा जागर व बचाव होण्यासाठी तसेच आपला भारत देश ज्या संविधानावर खंबीरपणे सुरक्षित उभा आहे , त्या संविधानाचे महत्व सर्वांना ज्ञात व्हावे , या करिता या ” संविधान दिनी ” २५ नोहेंबर २०२३ रोजी ” श्रद्धेय ऍड . बाळासाहेब आंबेडकर ” यांच्या प्रमुख नेतृत्वात मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ठीक ४ – ०० वाजता होणाऱ्या महाविराट ” संविधान सन्मान महारॅलीत ” कर्जत तालुक्यातील वंचित बहूजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, तसेच सर्व समाज बांधव व बहुजन वर्ग यांनी सामील व्हा , असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी केले आहे.

संविधान वाचेल – तर तुमचे आमचे अधिकार हक्क वाचतील व ते वाचवायचे असेल तर , २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत होणाऱ्या ” संविधान सन्मान महारॅलीत लाखोच्या संखेने सहभागी व्हा , तरी कर्जत तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी , विभाग पदाधिकारी , ग्राम शाखा पदाधिकारी आजी – माजी सर्व पदाधिकारी यांनी या रॅलीत यायच आहे , म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज मैदान , दादर – मुंबई , येथे मिळेल त्या साधनाने जाऊन ” संविधान सन्मान महारॅलीत सहभागी होवून”श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर ” यांचे विचार ऐकण्यास सामील होणे गरजेचे असल्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page