Wednesday, December 4, 2024
Homeपुणेमावळसदापूर येथील नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याची परंदवाडी येथे आत्महत्या…

सदापूर येथील नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याची परंदवाडी येथे आत्महत्या…

लोणावळा (प्रतिनिधी): सदापूर येथे नऊ वर्षीय चिमुकली वर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरगांव पोलिस स्टेशन हद्दीतील परंदवाडी येथे घडली.
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका 9 वर्षीय चिमुरडी वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवार दि.25 रोजी सायंकाळी 07:15 वा.च्या सुमारास सदापुर,ता. मावळ येथे घडली होती.या घटनेतील आरोपीचा अनेक स्तरातून शोध घेण्याची प्रक्रिया सुरु असताना आज दि.29 रोजी परंदवाडी येथील एका झाडाला ओढणीच्या साहाय्याने या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
विजय शशिकांत मालपोटे (वय 35 वर्षे ) असे गळफास घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
सोमवार दि.25 रोजी सायंकाळी 07:15 वाजण्याच्या सुमारास सदापूर येथे आरोपीने 9 वर्षीय पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याची फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे या घटनेचा तपास करत असताना यातील आरोपीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार परंदवाडी येथे उघडकीस आला आहे. याबाबत शिरगांव पोलीस पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page