मावळ (प्रतिनिधी): कामशेत जवळील अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमात सद्गुरू दादाजी अडानेश्वर भक्त लोणावळा, कार्ला, तळेगाव व पुणे यांच्या वतीने अन्नदान करून दिवाळी साजरी करण्यात आली .
श्री गुरु दादाजी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भक्तांनी घरी तयार केलेला दिवाळी फराळ आश्रम मध्ये वाटप करून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. सद्गुरू दादाजी अडानेश्वर भक्तांकडून केलेल्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे व सदस्यांचे आश्रम व्यवस्थापनाकडून कौतुक करण्यात आले यावेळी किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य म्हणाल्या , ‘ आजचा दिवाळीचा दिवस म्हणजे आनंद आणि उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.
अशा पवित्र दिवशी दादाजी अडानेश्वर भक्तांनी वृद्धाश्रमातील वृद्धाना फराळ वाटप करून हा सण साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली असून त्याबद्दल त्यांचे आभार मानते.
यावेळी किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य व लोणावळा, कार्ला, तळेगाव, पुणे येथील अडानेश्वर भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.