Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" समाज हिताची कामे म्हणजे बाळासाहेबांचा आदर्श "

” समाज हिताची कामे म्हणजे बाळासाहेबांचा आदर्श “

भव्य महा आरोग्य शिबिर भरवून ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे उल्लेखनीय कार्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )समाज हिताची कामे म्हणजे ” हिंदू हृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे ” यांची याप्रसंगी आठवण झाली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने समाजहिताचे निर्णय घेत असत, त्याच तत्त्वाने त्यांचाच आदर्श घेऊन कार्यसम्राट ” आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे ” कार्य करतात व समाजप्रती त्यांची तितकीच कळकळ आणि बांधिलकी आहे , असे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री किशोर मसुरकर यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रती ” गौरोदगार ” काढले . त्यांनी आम्हाला ही लोकसेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , समाजाच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत , या मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा संकल्प असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा सेवा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे . भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला . आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार मान. महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांच्या शुभहस्ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शिवतीर्थ हॉल, पोसरी, ता. कर्जत, जि. रायगड येथे करण्यात आले. या शिबिराला स्थानिक व तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमा साठी श्री नितीन शहा , श्रीमती नीना ठक्कर , श्री किशोर मसुरकर , श्री हरीश सहानी व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिरामध्ये मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच डोळे , दंतचिकित्सा, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे आजार व सर्जरी सल्ला तर महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी , संपूर्ण आरोग्य तपासणी व मोफत वाटपमध्ये चष्मे, औषधे व सॅनिटरी पॅड्स या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या . तर अपंग लाभार्थी यांना शिलाई मशीन व लकवा मारलेल्या रुग्णांना चालती खुर्ची देखील देण्यात आल्या.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. किशोर मसुरकर, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट, आणि संपूर्ण टीम यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिक , शिवसेना पदाधिकारी व शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page