Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळासरकारच्या विरोधात मराठा खासदार व मराठा आमदार असे फलक लावून कार्ला येथे...

सरकारच्या विरोधात मराठा खासदार व मराठा आमदार असे फलक लावून कार्ला येथे गाढव मोर्चा…

कार्ला (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी कार्ला फाटा येथे आमरण उपोषण व चक्री उपोषण सुरु आहे.या उपोषणकर्त्यांना सर्व स्तरावरून पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते मोठया संख्येने येत आहेत. तसेच महिला भगिनी देखील या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत आहेत.
परंतु केंद्र व राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचा आरक्षणाबाबत निर्णय होत नसल्याने काल लोणावळा शहर व ग्रामीण सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच लोकसभेत व विधानसभेत असणा-या मराठा खासदार व आमदार यांच्या विरोधात प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला.
यावेळी गाढवांना मराठा आमदार व मराठा खासदार असे फलक गळ्यात अडकवून कार्ला शिवशंकर मंदिरापासून हा गाढव मोर्चा सुरु करुन ज्या ठिकाणी उपोषण सुरु आहे तेथे तो नेण्यात आला. ह्या मोर्चा मध्ये सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाजाचे सदस्य आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.काल लोणावळा शहर व ग्रामीण भागातील महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा देत दिवसभर आंदोलनस्थळी ठिय्या मांडला होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page