लोणावळा (प्रतिनिधी):ओव्हळे नाही तर ओवळे असे गावाच्या नावात ग्रामपंचायत प्रशासनाने बदल करावा यासाठी श्री.म्हसोबाभक्त व शिवभक्त- अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने दि.10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओवळे ग्रामपंचायत च्या नावात बदल/दुरूस्ती करण्यात यावी.ह्यासाठी येणार्या पुढील ग्रामसभेमध्ये सदर विषय घेऊन सदर विषयाची सखोल चौकशी करून ग्रामसभेच्या ठरावाने, पुराव्याच्या आधाराने ग्रामपंचायतीच्या नावामध्ये बदल करण्याची कार्यवाही केली जाईल.असे लेखी आश्वासन ओवळे ग्रामपंचायत चे ग्रामसेवक जगजीवन मोढोरिये,सरपंच दिलिप ज्ञानेश्वर शिंदे,व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले.त्यामुळे दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी ओवळे गावचे सरपंच दिलिप शिंदे,ग्रामसेवक जगजीवन मोढोरिये, उपसरपंच अविनाश साठे , ग्रा.सदस्य पै.तुषार साठे , पै.समिर कराळे,हिरामण भालेराव आदी मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.