Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसर्वांना मदतीचा हात देवून सामाजिक जीवनात बहुमूल्य " अलौकिक कार्य " करणारा...

सर्वांना मदतीचा हात देवून सामाजिक जीवनात बहुमूल्य ” अलौकिक कार्य ” करणारा सर्वांचा तारणहार नंदू गुरव !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपणही या समाजाचे काही देणे आहोत , गरिबांच्या मदतीला कोण येणार , म्हणून आपणच खारीचा वाटा उचलून सामाजिक जीवनात सर्वांच्या मदतीला येणारा कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील गुरव आळी येथील सर्वांचाच ” बंधू म्हणजेच नंदू ” गुरव . त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवनच म्हणावे लागेल . नंदू गुरव यांचे वडिल गजानन ते सहा महिन्यांचे असतानाच वारले , त्यामुळे वडिलांचे छत्र हरविल्यावर त्यांच्या आईने खूपच धिटाइने काबाड कष्ट करून चार बहिणींना व त्यांना शिक्षण देवून मोठे केले . मी माझ्या आईमध्येच आई आणि वडील बघितले , आईच माझी गुरू माऊली आहे . असे भावनात्मक शब्द नंदू गुरव नेहमीच बोलून दाखवतात.

आजपर्यंत त्यांनी जेष्ठ महिला वर्ग , निराधार महिला , अपंग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान , श्रावण बाळ योजना , पेन्शन तसेच अपंग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत . प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून त्यांना शासनाच्या कार्यालयात नेले आहे . दहिवली गावातील पाणी प्रश्न , विजेची समस्या , किंवा सार्वजनिक शौचालय असो , आरोग्य स्वच्छता मोहीम असो नेहमीच मोर्चे – उपोषणे – निवेदन देण्यास व कर्जत नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करून सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला आहे . गुरव आळी – दहिवली हे नामकरण करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत . कोरोना काळात देखील त्यांनी फवारणी करणे , आजारी नागरिकांना जेवणाचा डबा , औषधे तसेच इतर दैनंदिन उपयोगी वस्तू घरपोच करून बहुमूल्य सामाजिक कार्य केले , म्हणूनच त्यांना पालिका प्रशासन व अनेक संघटनांनी तसेच गुरव समाजाने ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
दहिवली गावातील गुरव समाजाचा किंवा इतर कोणत्याही समाजाचा नागरिक आजारी असल्यास त्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणे , इतर सर्व समस्यात ते मनापासून सहकार्य करतात , दहिवली प्रभागात वीज – पाणी – गटार – रस्ते – सार्वजनिक शौचालय – या नागरी समस्या त्याचप्रमाणे रेशन कार्ड – उत्पन्नाचा दाखला – जातीचा दाखला किंवा इतर दाखले सर्व शासकीय योजनेचा लाभ असो , घरपट्टी – पाणीपट्टी – विजेचे बिल असो किंवा तहसील कार्यालय , नगरपरिषद मध्ये , प्रांत आफिस , तलाठी कार्यालय , उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नंदू गुरव मनापासून पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या निवारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नंदू गुरव हे सामाजिक कार्यात करत असलेले बहुमूल्य – निस्वार्थ कार्य खरच वाखानण्याजोगे असून कर्जत मधील दहिवली गावातील गुरव समाजा बरोबरच ते सर्वांचेच सामाजिक जीवनात तारणहार आहेत . त्यांच्या या बहुमूल्य सामाजिक कार्यात त्यांची पत्नी सौ. रुची या सावली सारखी त्यांच्या मागे कायम स्फूर्तिदायक उभ्या असतात . आपल्या गुरू माऊली आइंची सेवा करून त्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेच मला प्रेरणा मिळते असे सांगत आईं ताराबाई यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करून ” याची देही – याची डोळा ” त्यांना स्वर्गाची प्राप्ती मिळणार , हे म्हणणे वावगे ठरणार नाही . आज ५ एप्रिल श्री नंदकुमार गजानन गुरव त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य उदंड होवो , त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ मिळो , त्यांचे जीवन आरोग्यदायी जावो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
- Advertisment -

You cannot copy content of this page