![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
दहिवली परिसरातील ” अलौकिक कार्य ” करणारा सर्वांचा तारणहार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील गुरव आळी येथील रहाणारे सर्वांचाच ” बंधू म्हणजेच नंदू गुरव ” . सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सर्वांनाच मदतीचा हात देणारा म्हणून कर्जतमध्ये प्रसिद्ध आहे . गरिबीत दिवस काढल्याने त्यांना सर्वांचीच ” कळकळ ” असते , म्हणून सर्व कार्यात मदतीची जाण ठेवून ते सर्वांच्याच पुढे असतात . त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवनच म्हणावे लागेल . नंदू गुरव यांचे वडिल गजानन ते सहा महिन्यांचे असतानाच वारले , त्यामुळे वडिलांचे ” छत्र ” हरविल्यावर त्यांच्या आईने खूपच धिटाइने काबाड कष्ट करून चार बहिणींना व त्यांना शिक्षण देवून मोठे केले . माझी आईच सर्वस्व असल्याचे असे भावनात्मक शब्द नंदू गुरव नेहमीच बोलून दाखवतात.
आजपर्यंत त्यांनी जेष्ठ महिला वर्ग , निराधार महिला , अपंग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान , श्रावण बाळ योजना , पेन्शन तसेच अपंग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत . प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून त्यांना शासनाच्या कार्यालयात नेले आहे . दहिवली गावातील पाणी प्रश्न , विजेची समस्या , किंवा सार्वजनिक शौचालय असो , आरोग्य स्वच्छता मोहीम असो नेहमीच मोर्चे – उपोषणे – निवेदन देण्यास व कर्जत नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करून सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला आहे . ” गुरव आळी – दहिवली ” असे प्रभागाचे नामकरण करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत . कोरोना काळात देखील त्यांनी फवारणी करणे , आजारी नागरिकांना जेवणाचा डबा , औषधे तसेच इतर दैनंदिन उपयोगी वस्तू घरपोच करून बहुमूल्य सामाजिक कार्य केले , म्हणूनच त्यांना पालिका प्रशासन व अनेक संघटनांनी तसेच गुरव समाजाने ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे . दहिवली गावातील गुरव समाजाचा किंवा इतर कोणत्याही समाजाचा नागरिक आजारी असल्यास त्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणे , इतर सर्व समस्यात , विधी मध्ये ते मनापासून सहकार्य करतात , दहिवली प्रभागात वीज – पाणी – गटार – रस्ते – सार्वजनिक शौचालय – या नागरी समस्या त्याचप्रमाणे रेशन कार्ड – उत्पन्नाचा दाखला – जातीचा दाखला किंवा इतर दाखले सर्व शासकीय योजनेचा लाभ असो , घरपट्टी – पाणीपट्टी – विजेचे बिल असो किंवा तहसील कार्यालय , नगरपरिषद मध्ये , प्रांत आफिस , तलाठी कार्यालय , उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नंदू गुरव मनापासून पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या निवारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.
या त्यांच्या कार्याचा उपयोग यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत होऊन कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयात त्यांचा देखील खारीचा वाटा आहे . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नंदू गुरव हे सामाजिक कार्यात करत असलेले बहुमूल्य – निस्वार्थ कार्य खरच वाखानण्याजोगे असून कर्जत मधील दहिवली गावातील गुरव समाजा बरोबरच ते सर्वांचेच सामाजिक जीवनात ” तारणहार ” आहेत . त्यांच्या या बहुमूल्य सामाजिक कार्यात त्यांची पत्नी सौ. रुची या ” सावली ” सारखी त्यांच्या मागे कायम स्फूर्तिदायक उभ्या असतात.
आपल्या गुरू माऊली आइंची सेवा करून त्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेच मला ” प्रेरणा ” मिळते असे सांगत ” आईं ताराबाई ” यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करून ” याची देही – याची डोळा ” त्यांना स्वर्गाची प्राप्ती मिळणार , हे म्हणणे वावगे ठरणार नाही . आज ५ एप्रिल श्री नंदकुमार गजानन गुरव त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य उदंड होवो , त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ मिळो , त्यांचे जीवन आरोग्यदायी जावो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना !