राज्याशासनाने ठोस पाऊले उचलत शासन,प्रशासनाने आधिकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची मागणी..
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
महिला अधिकारी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं घर,कुटूंब सोडून सार्वजनिक कार्यक्षेत्रात काम करते त्यावेळी कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे महत्वाचे असून यादरम्यान कुठलाही अधिकारी पुरूष अथवा महिला असो त्यांच्यावर भ्याड हाल्ले नाही व्हायला पाहिजेत ज्यावेळेस असे प्रसंग घडतात त्यावेळेस शासनाने संबधित गुन्हेगारावर तात्काल खटला चालवून कठोर शिक्षा केली पाहिजे.
परंतु तेवढ्यावरच थांबून न राहता अशाप्रकारचे हाल्ले होवून नयेत तसेच हाल्लेखोरांची विकृत मानसिकता आहे तीसुध्दा समूल नष्ट करण्यासाठी राज्यपातळीवर राज्याशासनाने ठोस पाऊले उचलून शासन,प्रशासनाने आधिकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे मत खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनात खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे.
सोमवार दि.30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा हातगाडी फेरीवाला अमरजित यादव याने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
तसेच त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला. अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पूर्णपणे तुटून पडले. या दोघांनाही प्रथमता वेदांत रुग्णालय, ठाणे येथे नेण्यात आले. गंभीर दुखापत व जिवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तत्काळ ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे दाखल करण्यात आले. कल्पिता पिंपळे यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय असल्याने महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबई आणि महाराष्ट्र राज्य संळर्धन संघटना यांनी एकत्रित निर्णय घेवून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती येथे कडकडीत कामबंद आंदोलन करण्याचे अवाहन करताच खालापूर नगरपंचायतीत काळ्या फिती लावून तसेच कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध करीत शासनापर्यत आवाज पोहचविण्यासाठी खालापूरच्या नायब तहसिलदार कल्याणी कदम,पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्याकडे निवेदन मुख्याधिकारी सुरेखा भणगे,उपमुख्याधिकारी त्र्यंबक देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी दिले आहे.