Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळासहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई, जुगार अड्डयावर छापा, मुद्देमालासह दहा...

सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई, जुगार अड्डयावर छापा, मुद्देमालासह दहा जन ताब्यात…

लोणावळा : उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह सोमवारी रात्री त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकला.
यावेळी छापा टाकलेल्या ठिकाणी राहुल भरत इंगुळकर (वय 34, रा. वाकसई शेजारी ता. मावळ), संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय 36, रा. वेहेरगांव ता. मावळ), मंगेश विठ्ठल देशमुख (वय 46, रा. वेहेरगांव ता. मावळ), संजय विठ्ठल देशमुख (वय 43, रा. वेहेरगाव ता. मावळ), दिनेश पांडूरंग गायकवाड (वय 40, रा. वेहेरगाव ता. मावळ), चंद्रकांत हौजी देवकर (वय 42, रा. वेहेरगाव ता. मावळ), विनोद शरद नाणेकर (वय 42, रा. वेहेरगाव ता. मावळ), अजित सुनिल देवकर (वय 29, रा. वेहेरगाव ता. मावळ), मंगेश मारुती राणे (वय 40, रा. कामशेत ता. मावळ) संतोष काशिराम दळवी (वय 45, रा. वेहेरगाव ता.मावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, पंचासमक्ष पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची झडती घेतली असता यातील संतोष काशिराम दळवी (वय 45 वर्ष, रा. वेहेरगाव, ता. मावळ) याच्याजवळ 20 हजार 300 रुपये किमतीचे प्रतिबंधित अंमली पदार्थ आढळून आले असून त्याने हे अंमलीपदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे चौकशीत समोर आले.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लोणावळा ग्रामीण ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5 एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8 (क) 21 (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये नमुद सर्व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहने आणि इतर साधने असा एकूण 74 लाख 14 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांच्या पथकाने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page