if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
पौड (प्रतिनिधी) : आंबवणे (ता. मुळशी) येथील सहारा
सिटीमधून 1 लाख 80 हजारांचे लोखंडी पाईप चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. ही चोरीची घटना 26 डिसेंबर रोजी रात्री 12 च्या दरम्यान घडली होती. या घटनेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेले 4 ट्रक, 1 इनोव्हा कार, हायद्रा क्रेन, तसेच चोरीस गेलेले लोखंडी पाईप असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत सुमित कुमार अब्बड (वय 37, रा. सहारा सिटी, आंबवणे, ता. मुळशी) या सुरक्षा रक्षकाने फिर्याद दिली होती तर याप्रकरणी आरोपी आलम युसूफ मनियार (वय 33, रा. चिखली, मूळ रा. रायबरेली, उत्तरप्रदेश), सिद्धकी इस्लाम मोहम्मद खलीद खान (वय 45, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी, पुणे, मूळ रा. गॅलक्सी अपार्टमेंट, मोशी, ता . हवेली, पुणे), दिलीप गंडाप्पा पवार (वय 43, शांग्रीला गार्डन, पूर्णानगर, चिंचवड),अमित भगवान वालज (वय 32, सध्या रा. पोमगाव, ता. मुळशी, मूळ रा. कोथरूड, सुतारदरा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे .
पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आंबवणे येथील सहारा सिटीमधून 26 डिसेंबर रोजी रात्री 12 च्या दरम्यान 1 लाख 80 हजारांचे लोखंडी पाईप चोरीला गेले होते. त्यामुळे या पाईपची चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानुसार कौशल्यपूर्वक तपासचक्रे फिरवत पोलिसांनी आरोपींना एकापाठोपाठ ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदार व पाईपची ज्यांना विक्री केली होती त्यांची नावे सांगितली. त्यानुसार आरोपींकडून 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून एकूण 4 ट्रक, 1 इनोव्हा कार, हायड्रा क्रेन, तसेच लोखंडी पाईप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, हवेली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र शिंदे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस .बी. शिंदे व पथकातील अंमलदार रविंद्र नागटिळक, दिलीप सुपे, बी. जी. शिंदे, बाठे, पोलीस नाईक ईश्वर पोपट काळे, सिध्देश पाटील, सचिन सलगर, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे, सागर नामदास, तांत्रिक विश्लेषण अंमलदार सनिल कोळी, चंद्रशेखर हगवणे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगीरी केली आहे.