Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळासहा. उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची धडक कारवाई :१२ लाखांचा मुद्देमाल...

सहा. उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची धडक कारवाई :१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ जण अटक..

लोणावळा : प्रतिनिधी (श्रावणी कामत) सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांच्या नेतृत्वाखाली संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात कडक कारवाई करण्यात आली. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी. पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पहिली कारवाई:
दिनांक 09/06/2024 रोजी सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांनी त्यांच्या पथकासह कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांच्या चाळीत छापा टाकला. या छाप्यामध्ये दिनेश दीपक शिंदे (वय 24) व सौरभ राजेश शिनगारे (वय 24) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एकूण 32 ग्रॅम एम.डी. पावडर आणि पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्या असा एकूण 3,20,146/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कामशेत पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करत आहेत.

दुसरी कारवाई:
दिनांक 16/06/2024 रोजी श्री कार्तिक यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 06.20 वाजता रायगड ते कुरवंडे रोडवर छापा टाकला. या कारवाईत शिवाजी मारुती कडू (वय 35) व दिलीप बबन पिंगळे (वय 29) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझ्झा गाडीतून 04.40 ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आले, ज्याची किमत 44,000/- रुपये आहे. या कारवाईत एकूण 8,94,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणावळा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट, 1985 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करत आहेत.

संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 36.60 ग्रॅम एम.डी. पावडरसह 12,14,146/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात पो. हवा नितेश (बंटी) कवडे, पो. हवा अंकुश नायकुडे, पो. ना दत्ता शिंदे, पो. कॉ गणेश येळवंडे, पो. कॉ सुभाष शिंदे, पो. कॉ अमोल ननवरे, पो. कॉ अंकुश पवार, पो. कॉ गणेश ठाकूर, पो. कॉ प्रतीक काळे, पो. कॉ महेश थोरात, पो. कॉ सौरभ साबळे आणि पो. कॉ यश माळवे यांचे पथकाने केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page