if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(खालापूर दत्तात्रय शेडगे)
खालापूर साधू वासवाणी मिशन पुणे व साधू वासवाणी आश्रम मेडिकल सेंटर खंडाळा यांच्या वतीने सांगडे आदिवासीतील गोर गरीबांना मोफत धान्य आणि भांडी, वाटप करण्यात आले.
देशावर कोरोनाचे संकट असून सरकारने मिनिलॉकडाऊन जाहीर असल्याने यात गोर गरीब नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत याची वेळोवेळी ही साधू वासवाणी आश्रम ट्रस्ट यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवित असतात त्याचप्रमाणे आज देखील खालापूर तालुक्यातील सांगाडे आदिवासी वाडीतील 24 कुटूंबाना धान्यसह जीवनावश्यक वस्तू ,आणि भांडी वाटप करण्यात आल्या.
यावेळी साधू वासावणी आश्रम ट्रस्टचे लाल अडवाणी, मनोज मेहंतांनी,अरुण खेमलानी ,रवी जानकर, शहाजी सोनवणे, राजेंद्र ओव्हाळ, डॉ, आलिया, आदीसह अनेक उपस्थित होते.