Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसावरगाव गावातील नवरात्रीच्या निमित्ताने चेडोबा देव आणि कालिका माता पूजा अर्चा करून...

सावरगाव गावातील नवरात्रीच्या निमित्ताने चेडोबा देव आणि कालिका माता पूजा अर्चा करून घटस्थापना केली….

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने)

दि.21.दरवर्षी प्रमाणे यावर्षी कर्जत तालुक्यातील सावरगाव मधील चेडोबा देव आणि कालिका माता यांचे प्राणप्रतिष्ठा स्थापना करणयात आली.यावेळी परिसरातील ब मोठया प्रमाणत भावीक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात.
परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारी मध्ये पाहता शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून सध्या आणि सोया पद्धतीने नवरात्र देवीची पूजा अर्चा करणयात येते,चेडोबा देव मंदिर ठिकाणी पिंपळ व पायरीच्या वृक्षा खाली देवाचं मंदिर आहे.यावेळी चेडोबा देवस्थान यांच्या पुढाकाराने धार्मिक उपक्रम राबविले जातात असतात.आणि चेडोबा देव हे जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे.
येथील भाविक भक्त दर्शनासाठी भक्ती भावाने भक्त येत असतात आणि नवसाला पावणारे हे चेडोबा देव म्हणून ओळखत आहेत,संपूर्ण कर्जत परिसरातील आणि कर्जत बाहेरही चेडोबा देवस्थान प्रसिद्ध होत आहे.यावेळी चेडोबा देवस्थान कमिटी अध्यक्ष बबन ठाणगे,सचिव अशोक थोरवे,खजिनदार जितेंद्र कर्ताडे,सदस्य कृष्णा साळोखे,दशरथ शिंदे,देहू साळोखे,प्रमोद ठाकरे आदीसह मोठया श्रद्धेने आणि भक्ती भावनेतून मेहनतीने मंदिराची सेवा करीत असतात.
- Advertisment -

You cannot copy content of this page