Wednesday, January 29, 2025
Homeपुणेलोणावळासिंहगड इन्स्टिट्यूटच्या सानिका धनवेची युवा संगम अंतर्गत ओडिसा दौऱ्यासाठी निवड..

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सानिका धनवेची युवा संगम अंतर्गत ओडिसा दौऱ्यासाठी निवड..

सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीची राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु सानिका नितीन धनवे हिची युवा संगम फेज 5- ओडिसा दौऱ्यासाठी निवड.

लोणावळा : सिहंगड इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी लोणावळा येथे तृतीय वर्षात शिकणारी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु सानिका नितीन धनवे हिची युवा संगम फेज 5 अंतर्गत 10 दिवसीय ओडिसा दौऱ्यासाठी निवड झाली.केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमातील युवा संगम अभियाना अंतर्गत विविध राज्यांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी यासाठी दर वर्षी दोन राज्यांची भागीदारी करण्यात येते.
यावर्षी महाराष्ट्राचे भागीदार राज्य हे ओडिसा असून या दोन राज्यातील विद्यार्थ्यांनी परस्पर राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करावयाचा असतो. महाराष्ट्र राज्यातील आलेल्या हजारो अर्जांपैकी केवळ 45 अर्ज निवडले जातात, या मध्ये महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची निवड झाली.ह्या अभियानाचा उद्देश महाविद्यालयीन मुलांमध्ये आपल्याच देशातील वेगवेगळ्या राज्यातील सांस्कृतीक, सामाजिक परंपरा, रहिणीमान, इतिहास, भूगोल शेतीयाबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या मनात यांसाठी प्रेम निर्माण करणे हा आहे. या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि अभ्यास करण्याची संधी मुलांना मिळते. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर असा हा एकूण 10 दिवसांचा कार्यक्रम असून मुलांना आपली मुल्ले, सत्व, स्वत्व याची जाणीव यामध्ये होते. यामुळेच नक्कीच आपल्याला आपल्या देशाची विविध रंगानी नटलेली, बहुआयामी तरी एकरूप अशी संस्कृती जपण्यास मदत होईल.

सदर निवड प्रक्रियेसाठी प्राचार्य डॉ. एस डी बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री संतोष दबडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या कार्याबद्दल सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. (मिसेस) सुनंदा नवले, संस्थेच्या लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा चे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, , एस.के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ऍण्ड सायन्स चे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ फर्म्यासुटिकल सायन्सेस च्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्या डॉ. अंजली चॅटर्टन, निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page