if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे आंतरमहाविद्यालयीन ‘सिंहगड ऑलिंपस बॅडमिंटन २०२५’ स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांमध्ये मुला-मुलींसाठी सामने आयोजित करण्यात आले असून, सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. के. एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, एस. के. एन. सी. ओ. पी., कोंढवाच्या प्राचार्य डॉ. मीनल घंटे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ. अंजली चॅर्टटन, निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, स्पोर्ट्स समन्वयक प्रा. अनिरुद्ध कुलकर्णी, प्रा. आदित्य आदाटे, प्रा. विशाल राठोड यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती, टीम वर्क आणि क्रीडासंस्कृतीचा विकास होणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.