![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी संशोधन समन्वयक डॉ. एम. एस. चौधरी यांनी संशोधनाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. डॉ. एस. एन. पाटील आणि प्रा. एस. डी. दाते यांनी साहित्य सर्वेक्षण व समस्या ओळख यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. पी. एस. पाटील आणि प्रा. एस. एम. गायकवाड यांनी संशोधकाची वैशिष्ट्ये आणि व्यक्तिमत्व विकासावर भर दिला. तसेच, डॉ. एस. आर. पाटील आणि प्रा. के. एस. मुलाणी यांनी गट चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना धार दिली.
दुसऱ्या दिवशी संशोधन प्रक्रिया, डेटा संकलन आणि विश्लेषण या विषयांवर डॉ. सोनल गोरे, प्रा. बाळासाहेब सोनवणे, डॉ. साजित खांडेकर, डॉ. नाना शेजवळ, डॉ. डी. टी. माने आणि डॉ. चंद्रकांत कोकणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन विषयांचे सादरीकरण केले, ज्याचे मूल्यांकन डॉ. विजया राजेश्वरकर आणि प्रा. सुलक्षणा पाटील यांनी केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी डॉ. डी. एस. मंत्री, डॉ. संदीप सांगळे, डॉ. अभिजित कुलकर्णी आणि डॉ. अनुराधा ठाकरे यांनी संशोधन प्रकाशन, अहवाल लेखन आणि सादरीकरण कौशल्यांवर भर दिला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामध्ये एनएसएस स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नियोजन, समन्वय, तांत्रिक व्यवस्था आणि वक्त्यांचे सत्र नियोजन या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलक्षणा पाटील आणि प्रा. संतोष दबडे यांनी या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.
समारोप समारंभात प्रा. संतोष दबडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी समाप्तीची अधिकृत घोषणा केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ही कार्यशाळा भविष्यातील संशोधनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.