Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळासिंहगड एक्सप्रेसच्या कमी केलेल्या दोन बुगी वाढविण्याची, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची...

सिंहगड एक्सप्रेसच्या कमी केलेल्या दोन बुगी वाढविण्याची, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची मागणी…

लोणावळा(प्रतिनिधी): सिंहगड एक्सप्रेसचे दोन जनरल डबे बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे . रेल्वे प्रशासनाकडून जनरलचे दोन डबे बंद केल्यामुळे सुमारे 500 आसन क्षमता कमी झाली असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे प्रशासनाने जनरलचे दोन डबे त्वरित सुरू करावे व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी , अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली .

रेल्वे प्रवासी संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर होतो . पुणे आणि मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे . त्यातच रेल्वेचा प्रवास हा अल्प दरात व सुखकर होत असल्याने अनेकांनी रेल्वेला पसंती दिली आहे . कोरोना महामारी लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा ठप्प झाली होती . यानंतर सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करायला रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिरंगाई करण्यात आली .

रेल्वेकडून प्रथम लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या . रेल्वे प्रशासनाकडून पुणे – मुंबई दरम्यान सुरू असणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसचे दोन डबे कमी केले आहेत . यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे प्रशासनाने जनरलचे दोन डबे त्वरित सुरू करावे व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी , असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page