Friday, May 9, 2025
Homeपुणेलोणावळासिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत स्वच्छ वारी कार्यक्रमाचे आयोजन..

सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत स्वच्छ वारी कार्यक्रमाचे आयोजन..

लोणावळा : ( प्रतिनिधी श्रावणी कामत ) सिंहगड टेक्नीकल ऐज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात २ जुलै २०२४ रोजी “राष्ट्रीय सेवा योजने” अंतर्गत “स्वच्छ वारी, स्वस्थ वारी,हरीत वारी, निर्मल वारी” कार्यक्रमाचे आयोजन कॅम्प रोड पुणे येथे राबवण्यात आलेला आहे.

स्वयंसेवकांनी फळ वाटप करून वारकरण्या सेवा दिली तसेच वारी प्रस्थान झाल्या नंतर त्या जागेची संपूर्ण स्वच्छता केली आणि स्वच्छ वारी ह्या ब्रीद वाक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

प्राचार्या डॉ. अंजली चॅर्टटन व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक अभय रामदिन ह्यांचा मार्गदर्शना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व विद्यार्थी ह्यांनी ह्या कार्यास सहकार्य केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page