Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळासिहंगड इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीने साजरा केला रक्षाबंधन..

सिहंगड इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीने साजरा केला रक्षाबंधन..

लोणावळा -(श्रावणी कामत) सिहंगड इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, लोणावळा यांच्या वतीने रक्षाबंधन उत्सव धूमधामने साजरा करण्यात आला. या निमित्ताने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि लोणावळा सिटी पोलीस स्टेशनवर रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सणाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांचे समर्पण मान्य करत सिहंगड कॉलेजच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी सिहंगड कॉलेजच्या प्रोफेसर भाग्यश्री दशमुखे, प्रोफेसर कल्पना जाधव, सौ. सीमा गावडे आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
या विशेष प्रसंगी, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्यामुळे समाजात निर्माण होणार्या सुरक्षिततेची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे, एकमेकांच्या सुरक्षेला महत्त्व देणारा हा सण एक सकारात्मक संदेश देऊन गेला.
या कार्यक्रमाने रक्षाबंधनाच्या पावन दिवशी एकत्र येऊन समाजातील सुरक्षा यंत्रणा व त्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रति आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page