Sunday, November 24, 2024
Homeपुणेमावळसुभेदार कैलास येवले यांचे स्वागत व सेवा निवृत्ती सत्कार समारंभ वाकसई येथे...

सुभेदार कैलास येवले यांचे स्वागत व सेवा निवृत्ती सत्कार समारंभ वाकसई येथे संपन्न…

वाकसई (प्रतिनिधी) : भारतीय सैन्य दलामध्ये तीस वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले वाकसई गावचे सुपुत्र सुभेदार कैलास येवले यांचे काल वाकसई ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सुभेदार कैलास येवले यांचे वाकसई फाटा येथे आगमन होताच ग्रामस्थांकडून पुष्पहार व पुष्प गुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी आमदार सुनील अण्णा शेळके आणि राष्ट्रवादी नेते दिपक हुलावळे यांनी देखील सुभेदार कैलास येवले यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. नंतर ग्रामस्थांच्या वतीने सुभेदार कैलास येवले यांची वाकसई फाटा ते गावातील मारुती मंदिरापर्यंत वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.त्या ठिकाणी त्यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवर व ग्रामस्थांनी कैलास येवले यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तर कैलास येवले यांनी भारतीय सैन्य दलामध्ये काम करत असताना आलेले अनुभव व प्रत्यक्ष झालेल्या चकमकीची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्कार सोहळा कार्यक्रमात शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, वाकसई गावातील संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत येवले, माजी सरपंच मारुती येवले, माजी उपसरपंच मारुती देशमुख, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, माजी सरपंच मनोज जगताप, बाळासाहेब येवले, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी अमोल केदारी, गणपत विकारी, बाळासाहेब सत्तू येवले, किसन येवले, सुधाकर येवले, सुरेश येवले, संतोष येवले, कामगारनेते अमोल भेगडे,उद्योजक प्रतीक देसाई,सरपंच दिपक काशीकर, पोलीस पाटील अनंता शिंदे, यशवंत येवले,उद्योजक सुर्यकांत विकारी, उद्योजक विजय देसाई,अशोक ढाकोळ, प्रविण येवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच गावातील नागरिक, महिला व मुले मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन वाकसई ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत येवले यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page