if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : सूर साधना गायन क्लास चा द्वितीय वर्धापन दिन महिला मंडळ हॉल येथे साजरा करण्यात आला. आशा,लता व किशोर कुमार यांची बहारदार गिते सादर करण्यात आली. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तर कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे जेष्ठ महिला गायकांचे नृत्य पाहण्यासाठी आवर्जून रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती.पहिल्यांदाच सूर साधानाच्या 30 कलाकारांनी यात एकत्र सहभाग घेतला होता.
या वेळी सूर साधना चे संचालक प्रदीप वाडेकर यांचा कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्यानजी यांनी सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.सूर साधना क्लास च्या काही कलाकारांनी अप्रतिम गिते सादर केली तर जेष्ठ महिलांनी सामूहिक नृत्य सादर केले.या नृत्याला मार्गदर्शन करणारे प्रशांत नाईक यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, राष्ट्रवादी महिला आघाडी लोणावळा अध्यक्षा उमा मेहता, भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर अध्यक्षा विजया वाळंज, माजी अध्यक्षा योगिता कोकरे,सुजाता मेहता, पार्वती रावळ, जेष्ठ नेते धीरूभाई कल्यानजी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, मावळ वार्ताचे संचालक संजय अडसूळे, सचिव बापूलाल तारे, महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी,आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, सी बी जोशी, नितीन कल्याण, संजय गोळपकर, डॉ. नामदेव डफळ, राजेश मेहता, शिल्पा कोपरकर, सुरेश गायकवाड, मीनाक्षी गायकवाड,कांचन लुनावत, बापू कुलकर्णी, उदय पाटील, जयवंत नलोडे, रेश्मा गिध, किरण स्वामी, प्रिया मेहता, विशाखा गोळपकर, मृदुला पाटील, संध्या गव्हले, सुरेखा वाडेकर, अनुजा वाडेकर, गणेश जाधव, भगवान घनवट, प्रकाश लोखंडे, दत्तात्रय लाड, बाळासाहेब लोहिरे, विठ्ठल जाधव यांसमवेत महालक्ष्मी महिला मंचच्या सर्व पदाधिकारी जेष्ठ नागरिक संघांचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा अगरवाल, रश्मी सिरस्कर, सुनील पानंगावकर, पांडुरंग तिखे, मंगला राणे, गोरख चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.