if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): बनावट सोन्याच्या विटा व डायमंड खरे असल्याचे भासवून मोठ्या कंपनीच्या मालकाची फसवणूक करुण 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या, टोळीच्या म्होरक्यास गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी भिमा गुलशन सोळंकी (रा. बडोदा गुजरात, सध्या रा. देहूरोड पुणे ) यास अटक करून. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत मुंबई येथील राहणारा समद हमीद मकानी (वय 53 वर्षे,धंदा सॉफ्टवेअर कंपनीचा मालक ) यांनी दि.22 /9/2022 रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.दाखल फिर्यादेवरून गु.र.नं.172/2022, भा.द.वि.कलम 406, 417, 419, 420, 504, 506, 34.प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिनांक 27/09/2022 रोजी गुन्ह्यातील संशयित आरोपीची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.तसेच आणखी काही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गटटे, उपविभागीय पोलीस अधीकारी ढोले पाटील यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि नेताजी गंधारे ,सपोनि सचिन रावळ,पो.स.ई. प्रदीप चौधरी,सहा.फौजदार प्रकाश वाघमारे,
सहा. फौजदार हनुमंत पासलकर, सहा.फौजदार युवराज बनसोडे,पोहवा राजु मोमीन,पोना बाळासाहेब खडके,पोना शरद जाधवर,पोकॉ धिरज जाधव,पोकॉ प्राण येवले,मपोना मनिषा डमरे,चापोकॉ दगडू विरकर,पोकॉ मच्छिंद्र पानसरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.