Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" स्मॉल वंडर किड्स स्कूलचा " भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न !

” स्मॉल वंडर किड्स स्कूलचा ” भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न !

चिमुकल्यांना जडण घडणीत ” संचालक रोहिणी बनसोडे मॅडम ” अग्रेसर…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली सात वर्षे कर्जत मधील ” चिमुकल्या ” विद्यार्थ्यांना जडण घडणीत हातभार लावून त्यांना लहानपणीचे संस्कार , त्यांचे सुप्त गुणांना आकार देऊन स्टेज डेअरिंग वाढवून ” मातेप्रमाणे ” जोपासण्याचे महान कार्य नर्सरी स्कूलच्या माध्यमातून करून शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू करून ” स्मॉल वंडर किड्स स्कूल ” या नव्या रोपट्याचे भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला . या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के.जी., सीनिअर के.जी. आणि ॲक्टिव्हिटी सेंटर चा समावेश असून, CBSE अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे .

या प्रसंगी बाबू धवडे साहेब ( कर्जत पोलीस उपनिरीक्षक ) , प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव, मा. नगरसेविका भारती पालकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले . त्यांच्या समवेत उद्योजक बाळू मामा तवळे , मा. नगरसेविका संचिता संतोष पाटील (प्रभाग क्र. २), मा. नगरसेवक संतोष पाटील, सोमनाथ पालकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत शहर अध्यक्ष , कॉन्ट्रॅक्टर इरेश्वर गायकवाड , रुपेश गायकवाड , पचू अण्णा गायकवाड , मंगेश गायकवाड , रोशन नवाज , पत्रकार सुभाष सोनावणे , पत्रकार अभिजीत दरेकर , पत्रकार संकेत घेवारे यांच्यासह ” स्मॉल वंडर किड्स स्कूलचा संचालक रोहिणी बनसोडे , तुषार कृष्णा बनसोडे तसेच शैक्षणिक , सामाजिक, राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .

यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक बाबू धबडे साहेबांनी शुभेच्छा देताना शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण देऊन येथील विद्यार्थ्यांचे बौद्धिक, मानसिक व सर्जनशील विकास घडवून आणा . येथील असलेल्या कर्मचारी वर्गाचा पोलीस ” वर्तणूक अहवाल ” घ्या , असा सल्ला दिला . पत्रकार सुभाष सोनावणे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की , शिक्षण हे ” वाघिणीचे दुध ” आहे , ते जो प्राशन करतो तो जगाच्या कुठल्याही क्षेत्रात ” गुरगुरल्या ” शिवाय रहात नाही , शिक्षण क्षेत्रात हे दूध चिमुकल्यांना पाजून त्यांच्या सुप्त गुणांना घडविण्याचे महान कार्य ” स्मॉल वंडर किड्स स्कूलच्या ” माध्यमातून संचालक रोहिणी बनसोडे मॅडम गेली सात वर्षे करत असल्याचे म्हटले . या लावलेल्या स्कूलच्या रोपट्याचे ” वट वृक्षात ” रूपांतर व्हावे , अश्या शुभेच्छा दिल्या . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी बनसोडे दाम्पत्यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य असून लहान चिमुकल्यांना ” आई सारखे प्रेम ” देऊन जोपासून त्यांना घडविण्याचे महान कार्य करत असल्याने त्यांना या कार्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी मामा तवळे , सोमनाथ पालकर , यांनी देखील शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे शाल , पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

या शाळेच्या शाखा नाना मास्तर नगर, ठाकरे चौक , कुक्कू फार्महाऊस रोड, तवळे बंगला, कर्जत – रायगड , तर दुसरी शाखा – सौरभ बंगला, छत्रपती शिवाजी महाराज नगर दहिवली – कर्जत येथे असणार आहे . या ” स्मॉल वंडर किड्स ” स्कूलमध्ये आपल्या चिमुकल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश घ्या , असे आवाहन शाळेच्या संचालिका रोहिणी बनसोडे मॅडम यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष अभंगे धन्वंतरी चॅरिटेबल ट्रस्ट संचालक मंडळ सदस्य यांनी केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page