if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत जनजागृती अंतर्गत लोणावळा शहरातील सर्व शालेय विध्यार्थी व खुल्या गटाकरीता आज दि. 23 रोजी रायवूड गार्डन येथे चित्रकला / पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेकरीता शहरातील 20 शाळांमधून 1590 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सकाळी 8.00 वाजलेपासून मोठया प्रमाणावर विदयार्थी रायवूड मध्ये जमत होते. खुल्या निसर्गमय वातावरणामुळे विदयार्थ्यामध्ये मोठा उत्साह दिसत होता. लोणावळा नगरपरिषदेने इ.1 ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8 वी ते 10वी व खुला गट अशा चार गटात स्पर्धा आयोजीत केलेली होती.
या स्पर्धेची सुरुवात लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सरस्वतीचे पुजन करुन केली. सर्व विदयार्थ्याना शुभेच्छा देवून विदयार्थ्याशी संवाद साधला. यावेळी नगरपरिषदेने कार्टूनरुपी चित्रे सभोवताली लावून त्याद्वारे ओला, सुका, घातक कच-याची वर्गीकरणाबाबत जनजागृती केली. नगरपरिषदेने सर्व सहभागी स्पर्धकांना चित्रकला कागद, खाऊ इ. वाटप केले. त्यानंतर सर्व विदयार्थ्याची चित्रे काढून झाल्यावर सर्वाबरोबर स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळयाच्या घोषणा देवून मुलाबरोबर छायाचित्रे काढली. त्यामुळे विदयार्थी, शिक्षक खुप आनंदी झाले.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,माजी नगरसेवक विशाल पाडाळे, पत्रकार विशाल विकारी, संजय पाटील, नितीन तिकोणे, बंडू येवले व सर्व शाळांचे शिक्षकवर्ग, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते. रायवूड उदयान विभागाने त्यांच्या आवारातील जागा या उपक्रमासाठी विनामुल्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानन्यात आले.