Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" स्वसंवाद " केल्याचे दुष्परिणाम काही अवधीने " स्फोटजनक " ठरू शकतात...

” स्वसंवाद ” केल्याचे दुष्परिणाम काही अवधीने ” स्फोटजनक ” ठरू शकतात , म्हणून वेळीच आपले ” मत ” प्रदर्शित करा – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) या निसर्गात खूप मोठ्या घडामोडी होत असतात . त्याचप्रमाणे ” व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ” देखील आपल्याला पहाण्यास मिळतात . यातील एक स्वभाव म्हणजे ” स्वसंवाद ‘ करणे . स्वसंवादांचं महत्व सायकॉलॉजी मध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये कित्ती महत्त्वाचे आहे , हे काही घटना घडल्यावर आपणास कळते . स्वसंवाद केल्याचे दुष्परिणाम काही अवधिने आपल्याला अनुभवास मिळतात .म्हणून वेळीच आपले मत प्रदर्शित न केल्यास स्वसंवादाने आपल्या आयुष्यात ” स्फोट ” होवू शकतात , असे महत्त्वपूर्ण विचार मनस्वास्थ्य केंद्राच्या समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले आहेत.

स्वसंवाद , म्हणजे स्वतःशी केलेला सवांद . हा प्रत्येक माणसाचा स्वतःशी सतत सुरु असतो. आपण विचार करतो म्हणजे आपण एक प्रकारे स्वतःशी , स्वतःच्या मनाशी बोलत असतो . खूप वेळा आपण रस्त्याने किंवा आजूबाजूला लोकं एकटे हातवारे करत बोलत असताना किंवा तोंडातल्या तोंडात बोलत असताना बरेच वेळा बघत असतो . खरंतर ते स्वतःशीच बोलत असतात , कधीतरी त्यांचे चेहऱ्याचे हावभाव बदलतात , तर कधी हाताची हालचाल होत असते , तेव्हा ती सगळी लोकं खरंतर स्वतःशी इतकी तल्लीन झालेली असतात कि त्यांना आजूबाजूच्या जगाच अथवा कुणाचेही भान पण नसतं.

खरंतर मनुष्यप्राणी हा सृजनशील व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे . माणूस खरंतर जसा चांगला विचार करतो तसा वाईटही विचार करू शकतो , त्याच्या मनातल्या भावना ओळखून त्या मांडू शकतो , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोलूही शकतो. आपण खूप वेळा म्हणतो ” जे ओठावर आहे तेच पोटात पण आहे ” म्हणजे काय तर जो विचार डोक्यात आहे , तेच विचार आपण बोलत असतो . खरंतर आपल्या संपर्कात असलेली एखादी व्यक्ती किंवा परिस्थीती आपल्याला हवी तशी नसते , किंवा सगळीच माणसं आपल्याला रुचतात किंवा आवडतात असं नसतं , पण कधी ” नात्याची किंमत ” तर कधी ” वयाचा मान ” किंवा ” आपला चांगुलपणा ” म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीशी चांगलं बोलण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करत असतो . खूपदा आपण त्यात यशस्वी पण होतो , पण डोक्यात त्या माणसाचे विचार चालूच राहतात . असं का बरं होत असेल कधी आपण विचार केला आहे का ? कारण आपला ” स्वसंवाद ” त्या व्यक्ती बद्दलचा वेगळा असतो , आणि तो व्यक्ती समोर आल्यानंतरचा स्वसंवाद संपूर्णपणे बदलेला असतो.

ह्या सगळ्यात घातक काय ? तर आपले विचार आपण समोरच्या पर्यंत न पोहचवल्यामुळे झालेला मनस्ताप व त्यातून वाढणाऱ्या अपेक्षा , मग त्यातून वाढणारी तुलना , मग होणारी चिडचिड , आणि एक दिवस कोणाच्या मनात नसताना होणारा स्फोट . अश्या वागण्याने त्यातून शांतता मिळते का तर अजिबात नाही , उलट नात्यामधले वाढलेले गैरसमज आणि ह्या सगळ्याचा संबंध आपल्या स्वसंवादाशी आहे , यावर महत्त्वपूर्ण प्रकाश समुपदेशक देवश्री जोशी यांनी टाकला.

आपण जर सासू – सून पाहिली तर , पहिले काही वर्ष सून सगळ्यांना खुश करण्यासाठी , सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागते त्यातून घरच्यांच्या अपेक्षा सुनेकडून वाढल्या जातात . जसे दिवस जातात , वर्ष सरतात तसे सगळे सुनेला गृहीत धरतात आणि मग एक दिवस स्फोट होवून सुन ती घरात आल्यापासूनचा ” हिशोब ” सगळ्यांच्या बाबतीत बोलून दाखवते . सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं केवढं हिच्या डोक्यात होतं , पण बघायला गेलो तर काही – काही गोष्टी खरंतर तेव्हाच बोलल्या असत्या तर सुटल्या असत्या , पण आज इतकं ” रुद्र ” अवतार सुनेने धरला होता की ती हीच का आपली मौंनधारी सून ? असा प्रश्न पडतो . असं का घडलं तर सुनेच्या बाबतीत पण तिचा स्वसंवाद खूप वर्षांपासून स्वतःशीच होता , आणि ती एक वेगळ्या जगात राहून वेगळं वागत असल्याने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण ह्यातुन जे प्रश्न आहेत ते खरंतर सोडवला गेलाच नाही , उलट अजून सगळ्यांची मन कलुषित झाली. त्यामुळे शक्यतो जो स्वसंवाद सुरु आहे तोच तोंडावर असुद्या , बोलून मोकळे व्हा , जेणेकरून वेळ निघून जाणार नाही आणि नाती पण दुरावणार नाही , आणि तुटणार नाहीत.

ह्या स्वसंवादाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत , सकारात्मक आणि नकारात्मक ! आपण आपल्या मनाशी सातत्याने काय बोलतो आहोत ह्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. स्वसंवाद सकारात्मक ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आपण सततच सकारात्मक विचार करू शकत नाही , त्यावेळी स्वसंवाद नकारात्मक न करता कसा सकारात्मक करू शकतो , तर ह्याची सवय लावावी लागते आणि त्याही पेक्षा आपला स्वसंवाद काय सुरु आहे हे देखील ओळखणं , जाणून घेणं , ह्यासाठी पण प्रयत्न , चिकाटी आणि मान्य करण्याची तयारी , आवश्यक असते . खूप वेळा हे समजतच नसतं की स्वसंवाद मध्ये आपण खूप टोकाचा विचार करत आहोत , तेव्हा हा प्रश्न पडतो की नक्की हा विचार करणारी हि मीच / हा मीच आहे ना ?

कुठला ही चांगला बदल आपल्या आयुष्यामध्ये करायचा असेल तर चांगल्या विचारांचा ” स्वसंवादावर ” काम करा , नक्कीच बदल घडतील. आपल्याला योग्य मार्ग दाखविण्यासाठी व जीवनात ” गरुड भरारी ” घेण्यासाठी आम्ही आहोतच , तर यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जत येथे संपर्क करा. समुपदेशक देवश्री जोशी आपल्या शेवट पर्यंत साथ देणार आहे . आपला एक कॉल देवश्री जोशी – ९५२७६७६००८ करून आपले आयुष्य – जीवन बदला.
- Advertisment -

You cannot copy content of this page