Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळास्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र विधानसभा दालनातून कढून टाका,या वक्तव्याच्या निषेध..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र विधानसभा दालनातून कढून टाका,या वक्तव्याच्या निषेध..

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर भाजप च्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील प्रसारणमंत्री प्रियांका खर्गे यांचा निषेध करण्यात आला.
विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे,असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि प्रियांका खर्गे यांनी केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. खर्गे यांच्या या विधानाचा निषेध करीत लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्तावर उतरले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांनी खर्गे यांचा निषेध करीत असतानाच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धिरज साहू आणि काँग्रेस पक्षाच्या विरुद्धही जोरदार घोषणाबाजी केली.
वीर सावरकर तैलचित्र वाद आणि इन्कम टॅक्स भ्रष्टाचार प्रकरणावरून काँग्रेस ला लक्ष करत सभा आयोजित करण्यात आली यावेळी “काँग्रेस ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नक्की काय एलर्जी आहे कळत नाही, जो उठतो तो सावरकर यांच्या विरोधात टीका करतो. यांच्यावर टीका करणाऱ्यांना सावरकर यांच्या पायाच्या धुळीचीही सर नसल्याची” टीका केली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमी ओरडत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकला, परंतु जनतेला आता कळतंय की देश नक्की कोणी विकून खाल्ला. एकीकडे गरिबी हटाव असा नारा काँग्रेस देत आहे पण दुसरीकडे याच गरिबांचा पैसा आजवर कोणी खाल्ला आहे हे काँग्रेस खासदार धिरज साहू यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यातून दिसून येत असल्याची टीका भाजप शहराध्यक्ष अरुण लाड यांनी केली.
यावेळी आयोजित निषेध सभेला माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजप शहराध्यक्ष अरुण लाड, कार्याध्यक्ष सुधीर पारिठे, सरचिटणीस शुभम मानकामे, बाबू संपत, संतोषी तोंडे, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी जगदाळे, महिला आघाडी शहराध्यक्षा विजया वाळंज, माजी नगरसेविका कांचन गायकवाड, हर्षल होगले, संतोष जंगले, प्रफुल्ल काकडे, सुनील तावरे, नवीन भुरट, नंदू जोशी, परिजा भिलारे, रमेश गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page