Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळास्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन पदयात्रा व श्रद्धांजली सभेचे लोणावळ्यात आयोजन !

स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन पदयात्रा व श्रद्धांजली सभेचे लोणावळ्यात आयोजन !

लोणावळा(प्रतिनिधी ):भारतीय स्वातंत्रदीनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन करण्यासाठी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशन, हमाल पंचायत मावळ, धरणग्रस्त कृति समिति मावळ,जनरल कामगार सभा मावळ, क्रांतिकारी जन संघटना मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहरात अभिवादन पदयात्रा व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

सदर पदयात्रेस भांगरवाड़ी येथून आरंभ होत बाजारपेठ, सिद्धार्थनगर, गांवठाण, शेतकरी पुतळा अशी फिरवत छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली.यावेळी भर पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हमाल पंचायतचे राजाराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा घेण्यात आली.

सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव सच्चिदानंद बलराज यांनी केले तसेच लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड,लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशनचे उपाध्यक्ष कोंडीबा रोकडे, माजी नगरसेवक व लोणावळा सहकारी बँकेचे संचालक साहेबराव टकले आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले तर यावेळी माजी नगरसेवक शिवदास पिल्ले हे देखील सभेला प्रामुख्याने उपस्थित होते.

त्याचबरोबर पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशनचे संजय गुरव, विलास कांबळे, बी. बी. गोसावी,सुलतान शेख, जयसिंग कांबळे,सुनील गोसावी यांच्यासह हमाल पंचायतचे प्रकाश कदम, नवनाथ आड़कर,विलास ढम व मुकुंद काऊर यांनी विशेष परिश्रम घेतले.सभेच्या अखेर क्रांतिवीर शहीदांना श्रद्धांजली वाहन्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page