Sunday, August 3, 2025
Homeपुणेमावळस्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अंदर मावळ विभागीय बैठकीचे आयोजन...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अंदर मावळ विभागीय बैठकीचे आयोजन…

मावळ (प्रतिनिधी) :स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अंदर मावळ विभागीय बैठक रविवार दि.19 रोजी सकाळी 11 वाजता इंगळूण येथे उत्कर्ष तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीत सर्व विभागीय पदाधिकारी व शाखा अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अंदर मावळ विभागाकडून करण्यात आले आहे.

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून सदर बैठकीचे विषय पुढील प्रमाणे असतील 1) विभागीय मेळावा घेण्याबाबत चर्चा करणे . 2) विभागीय कार्यकर्त्यांची पदे भरण्याबाबत .3) महिला कार्यकारिणी अध्यक्ष व पदाधिकारी नेमण्याबाबत . 4 ) ज्येष्ठ नागरिक कार्यकारिणी तयार करण्याबाबत . तसेच 5) ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे .आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात येणार असून सर्व पदाधिकारी, नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची विनंती अंदर मावळ विभागाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page