लोणावळा (प्रतिनिधी): लायन्स क्लब लोणावळा डायमंड च्या वतीने नांगरगाव येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मठात महा प्रसादासाठी लागणारे अन्न धान्य व इतर वस्तूंचे वाटत करण्यात आले.
मागील काही वर्षांपासून लायन्स क्लब डायमंड हे कुठल्याना कुठल्या पद्धतीने समाजकार्य करत आहे. त्यांतर्गत सोमवारी प्लास्टिक चा वापर कमी व्हावा व प्रदूषण टळावे या उद्देशाने भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप तर काल मंगळवारी नांगरगाव स्वामी समर्थ अन्नछत्र मठात 300 लोकांच्या महा प्रसादासाठी अन्न धान्य व इतर वस्तू देण्यात आल्या.
यावेळी लायन्स क्लब डायमंडचे अध्यक्ष लायन अनंता गायकवाड, क्लबचे सचिव लायन अनंता पाडाळे,खजिनदार लायन तस्नीम थासरवाला, लायन लायन डॉ.संदीप डोबले,लायन दाऊद थासरावला , लायन रेखा पाडाळे, लायन दिपाली डोबले.आदी सभासद उपस्थित होते.