वाकसई(प्रतिनिधी) : देवघर येथील स्व. वामनराव हैबतराव देशमुख या विद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी गणेशमुर्ती रंगकामाचे धडे घेतले.
विद्यालयात यावर्षी कलाशिक्षक अनिल पटेकर यांनी एक नविन प्रयोग करत गणपती बाप्पाच्या मुर्ती रंगरंगोटीची कार्यशाळा भरवली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे आपला सहभाग नोंदवला . या कार्यशाळेत विद्यालयातील मुलांना गणेश मुर्तीचे रंगकाम कशा प्रकारे केले जाते , हे दाखविण्यासाठी पेण येथून रंगकाम न केलेल्या शाडूच्या छोट्या मुर्ती शाळेत आणून मुलांना गणपती मूर्तीला रंगकाम कला शिकवली व मोठ्या उत्साहाने आपल्या हाताने रंगकाम केलेल्या गणेशमुर्तीची हे विद्यार्थी आपल्या घरी प्राणप्रतिष्ठापणा करणार आहेत.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापुसाहेब पाटील , शिक्षक व्ही . के . गायकवाड , भगवंत क्षीरसागर , विजय कचरे , मनिषा ठिकेकर , प्रविण हुलावळे यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सुध्दा उपक्रमात सहभागी झाले होते.