if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दीपावली निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्ही.पी.एस हायस्कूल ची इमारत दिव्यांनी उजळून निघाली. यंदाचा दीपोत्सव विद्यार्थ्यांच्या सहभागामधून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्याला शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये प्रशालेमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये पणत्या जमा केल्या तसेच शिक्षकांनी सुद्धा आपल्या परीने पणत्या जमा करून आपला सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. अशाच उद्देशाची थीम यंदाच्या दीपोत्सवानिमित्त तयार करण्यात आली, तयार केलेल्या थीम मधून नागरिकांना आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावण्यासाठी आवाहन करण्यात आले. थीम तयार करण्यासाठी प्रशालेतील स्काऊट शिक्षक संजय पालवे आणि कलाशिक्षक चंद्रकांत जोशी यांनी प्रयत्न केले. दीपोत्सवानिमित्त महेश चोणगे यांनी सुंदर फलक लेखन केले.
दीपोत्सवाची सुरुवात नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य अरविंदभाई मेहता, शाळा समिती सदस्य राजेशजी मेहता, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक सुहास विसाळ, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी संजीवनी आंबेकर आणि जेष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर, सविता सिंग, पालक प्रतिनिधी मोकाशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांनी प्रशालेतील परिसरातील दिवे प्रज्वलित केले.
विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह विजयजी भुरके आणि शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या.
दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी स्काऊट शिक्षक संजय पालवे, कलाशिक्षक चंद्रकांत जोशी, योगेश कोठावदे, वैशाली तारू, रवी दंडगव्हाळ, सचिन थोरात, निलेश ढाकोळ, अनुजा गोसावी, किरण म्हस्के, जितेंद्र बागल, साक्षी वाणी, साक्षी सातपुते, रूपाली खेंगरे, रूपाली मोरे, दीपक बिरादार, प्रीती म्हात्रे सेवक सचिन गवळी, मुकुंद जगताप, विकास आढाव, संगणक विभागातील शिक्षिका, स्काऊट आणि गाईड विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सेवक राहुल थोरात यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना खाऊ आणि लाडूचे वाटप केले.