if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील कर्जत नगरीच्या जवळच असणाऱ्या हालीवली ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत व सर्वोत्तम सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या कार्यकर्तृत्वामुळे नावारूपाला आलेली ग्रामपंचायत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्येने व इमारती बांधकामामुळे वाढत असलेल्या या ग्रामपंचायती मध्ये अपुऱ्या निधीमुळे कचऱ्याचे नियोजन थांबले होते.
मात्र लवकरच कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावू , असे मत हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी व्यक्त केले आहे.हालिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . प्रमिला बोराडे या एक महिला सरपंच असुनही एखाद्या पुरुषालाही लाजवेल , अशी त्यांची गेल्या साडेतीन वर्षातील कामगिरी आहे. एक महिला असुनहि त्यांनी अगदी अल्पावधीत विकास कामांचा डोंगर रचला .त्या उच्च शिक्षित असुन त्यांनी सामाजिक जाणीवेपोटी गावाच्या अध्यात्मिक , शैक्षणिक , सांस्कृतिक, राजकीय , क्रीडा , आरोग्य , रस्ते , स्वच्छता पाणी , अशा एक ना अनेक पैलुंचा विचार करून विविध उपक्रम आपल्या गावात राबविले.” गावाचा विकास हाच आमचा ध्यास ” हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे.
कोरोना सारख्या महामारीमध्ये त्यांनी दाखविलेली ” जागृतता – तत्परता – कर्तव्यपरायणता ” याची आठवण आणि साक्ष आजही ग्रामस्थ देतात . त्यावेळी फक्त एकच ध्यास होता माझे गाव वाचले पाहिजे म्हणूनच अष्टभुजा बनुन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एक महिला सरपंच दारोदारी – घरोघरी पायाला भिंगरी लावून फिरत होत्या ,व त्यांनी सर्वांचे रक्षण केले . सर्वांच्या सहकार्याने नवनविन उपाययोजनांची अंमलबजावणी स्वतः हजर राहून करत होत्या .जेव्हा भले भले दारे खिडक्या बंद करून बसले होते तेंव्हा सरपंच सौ.प्रमिला बोराडे या न घाबरता न डगमगता संकटांशी दोन हात करण्यास सज्ज होत्या.
मग गावाच्या छोट्या मोठया गोष्टींचा विचार सरपंच करत नसतील असे कुणास का वाटावे ? असा प्रश्न त्यांनी आज उठलेल्या कचऱ्याचे नियोजन बाबत उपस्थित केला आहे.गावाचा विकास करताना सरपंच सौ.प्रमिला बोराडे म्हणाल्या की , सरपंच झाल्याबरोबरच स्वच्छता , पाणी , लाईट , गटार सफाई , विविध शासकीय योजना १०० टक्के राबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर स्वच्छता अभियान राबविले , महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला ,म्हणूनच पहिल्याच पाडव्याला एका नविन कामाची सुरूवात केली. घंटागाडी सुरू केली , यामुळे महिला , ग्रामस्थ खुश होते.गाव व आजुबाजुचा परीसर चकाचक दिसु लागला. ट्रक्टर मध्ये कचरा जमा करून तो नगरपरीषदेच्या कचरा संकलन केंद्रावर पाठविला जायचा ओला व सुका कचरा अशी वर्गवारी केली जायची.महिला देखील जबाबदारी घेऊन सहकार्य करत होत्या.
परंतु काही कारणास्तव नाईलाजाने सरपंचाना घंटागाडी बंद करावी लागली. त्यानंतर देखील प्रत्येक सणावाराला गावातील गटारे स्वच्छ करणे , कामगारांच्या, जे.सी.बी.च्या सहाय्याने सफाई करणे,पावडर मारणे,फवारणी करणे अशा प्रकारे ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पाडतच आहे.गेल्या काही दिवसातील ” सागर सरगम आणि सिग्नेचर डिझायर ” या बिल्डिंग मधील लोकसंख्या हि मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण देखील वाढु लागले आहे.गावात मोठ्या प्रमाणात विकासकामांवर खर्च करण्यात आलेला आहे. त्यामुळे घंटागाडी खरेदी करण्यासाठी सध्या पुरेसा ग्रामनिधी उपलब्ध नाही.
चालु 2022 – 2023 च्या पंधरावा वित्त आयोगामध्ये सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी घंटागाडी साठी निधीची तरतुद केलेली आहे यावर प्रकाश टाकला , परंतु निधी अदयाप पर्यत मिळाला नसल्याने निधीच्या अभावामुळे हालिवली गाव स्वतः च्या हक्काच्या घंटागाडी पासून वंचित आहे. यासाठी पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात घंटागाडी सुरू करण्यासाठी कर्जत नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी तसेच किरवली ग्रामपंचायतीचे सरपंच कांबरी यांच्या बरोबर बोलणी झालेली आहे.
सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांना बरोबर घेऊन नगरपरिषदे बरोबर बोलणी करणार आहे , जर यात सकारात्मक चर्चा झाली तर हालिवली गावच्या कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल , अशी ग्वाही व दिलासा सर्व नागरिकांना हालीवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी दिला आहे . तर स्वतः जेसीबी लावून वाढत्या कचऱ्याचे बिमोड करत परिसर स्वच्छ केला आहे.