Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" हा पक्ष प्रवेश म्हणजे आमच्या विजयाची नांदीच "…

” हा पक्ष प्रवेश म्हणजे आमच्या विजयाची नांदीच “…

सर्वांच्या साथीने या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणार – आमदार महेंद्र शेठ थोरवे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) माझ्या पासून लांब गेलेले कट्टर शिव सैनिक ज्यांचा ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी नाळ जुळली आहे , अहोरात्र जनतेचे प्रश्न , समस्या सोडवत आहेत , असे सुदाम शेठ पवाळी व खालापूर तालुक्यातील उल्हास आप्पा भुर्के , माझा मित्र अमोल पाटील हे पुन्हा शिवसेनेत आल्याने व त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्याने हा पक्ष प्रवेश म्हणजे आमच्या ” विजयाची नांदीच ” असल्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मत व्यक्त केले . शिवतीर्थ पोसरी येथे आयोजित केलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की , या सर्वांच्या साथीने इथे भगवाच फडकणार . सर्व पदाधिकारी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत , रोज पक्ष प्रवेश होत आहेत , शिवसेनेची ” वज्रमूठ ” अधिक घट्ट होत आहे , प्रत्येकाशी तळागाळात माझी नाल बांधलेली आहे . सुदाम शेठ शिवसेनेत येण्यासाठी ता. प्रमुख संभाजी जगताप यांनी खूप मोठे ” कार्य व त्याग ” केला असल्याचे गौरोद्गार त्यांनी केले . सर्व माझे सहकारी माझ्या बरोबर असणे गरजेचे आहे . विकास साधताना १८ तास काम आम्ही प्रामाणिकपणे केले . मागील काळात शिवसेना दुभंगली , पुन्हा शिवसेना सत्तेत आली , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अडीच वर्षात खूप मोठे कार्य केले , महिला सक्षमीकरण करण्यासाठी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” ही योजना आणून खूप मोठे पाऊल उचलले आहे , या मतदार संघात आम्ही दिशा देण्याचे काम केले , शिवसेनेचे बळ वाढत चालले आहे , सुदाम शेठ याचे कार्य शिवसेनेसाठी ” अनमोल ” आहे , प्रसंगी कर्ज बाजारी होवून काम करणारा शिव सैनिक असल्याचे त्यांनी सांगितले . रवी अहिनकर , हा शिव सैनिक पायी चालत जाऊन प्रचार करणारा कार्यकर्ता आहे , अशी खंबीर फळी माझ्या सोबत असल्याने भगवा फडकणारच , यावर त्यांनी प्रकाश टाकला . यावेळी उल्हास भुर्के यांची सह संपर्क प्रमुख नियुक्ती केली , सुदाम पवाळी यांची कर्जत तालुका प्रमुख पदी नियुक्ती , संभाजी जगताप जिल्हा संघटक पदी नियुक्ती , इतरांची देखील नियुक्ती करण्यात आली.

तर दोन्ही उमेदवार ” मातोश्रीवर ” छापा पडतो की काटा , ” नजर वर ” करून प्रतिक्षेत बसले आहेत , असा शाल जोडा त्यांनी मारत पण इथे भगवाच फडकणार , येथील सुज्ञ जनता आहे , विकासाला प्राधान्य देणारी आहे , २९०० कोटी रुपये निधी जनतेच्या विकास कार्याला आणले आहे , सर्व समाजाला बरोबर घेवून काम केले आहे , येणाऱ्या २९ तारखेला मोठ्या ताकदीनिशी अर्ज भरणार आहोत , असे त्यांनी जाहीर केले . यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला , तर कर्जत रेल्वे रिक्षा चालक मालक संघटनेने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.
- Advertisment -

You cannot copy content of this page