Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेची चालवलेली बदनामी थांबवावी..अन्यथा दावा ठोकणार..

हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेची चालवलेली बदनामी थांबवावी..अन्यथा दावा ठोकणार..


हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा कमिटीचा पत्रकार परिषदेत सर्वच बाबींचा उलगडाा..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे –

कर्जत-गेली काही महिने कर्जतमधील हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेचा विषय मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या संदर्भात ज्या – ज्या आवश्यक सरकारी परवानग्या होत्या , त्या सर्व परवानग्या संस्थेने अधिकृतरित्या प्राप्त करून घेतलेल्या आहेत , आणि त्याच अनुषंगाने आज हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेचे बांधकाम सद्य स्थितीत चालू आहे.

परंतु या सर्व रितसर कायदेशीर परवानग्या घेऊन सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेला नाहक बदनाम केले जात आहे , संबंधित बदनाम करणारे आमच्या विरोधात सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया हरले असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांतीविर , देशासाठी बलिदान देणारे , भाई कोतवाल यांचे नांव असलेल्या संस्थेला बदनाम करीत असल्याने हा संस्थेसह क्रांतीवीरांचा अपमान करत असल्याचे प्रांजळ मत मांडत आज हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेची कमिटी कर्जतकरांना आवाहन करण्याच्या हेतूने पत्रकार परिषदेस सामोरी गेली.


हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेसंबंधी कर्जतमध्ये चाललेल्या वादग्रस्त चर्चेविषयी कमिटीने पत्रकार परिषद रॉयल गार्डन हॉलमध्ये आयोजित केली होती .त्यावेळी कमिटीचे अध्यक्ष- चंद्रकांत दुर्गे , सचिव – शंकर भिंगारे , खजिनदार – उदय मांदुसकर , विश्वस्त- रमेश देशमुख , विश्वस्त – शिवाजी भासे , शशिकांत कडव , सुनील दुर्गे , आदी उपस्थित होतेे.


यावेळी बोलताना कमिटीने सांगितले की , दबाव तंत्राचा वापर करून व सोशल मीडियावर संस्थेची बदनामी ऍड .हृषीकेश जोशी व नाभिक समाजाचे विशाल कोकरे हे व्यायाम शाळा होऊ नये म्हणून करत आहेत .ऍड.हृषीकेश जोशी व विशाल कोकरे यांनी ज्या- ज्या कायदेशीर संस्थाकडे हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळे विरोधात तक्रारी केल्या त्या – त्या संस्थानीं म्हणजे मा. उच्च न्यायालय , मा. जिल्हाधिकारी , धर्मादाय आयुक्त , प्रांत अधिकारी , तहसीलदार , नगर परिषद , यांनी सदर तक्रारीत काहीही तथ्य नसल्याने त्या फेटाळल्या आहेत.

तसेच उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका , दिवाणी न्यायालयातील दावा , धर्मादाय आयुक्तांकडे केलेले अपील हे देखील तथ्य नसल्याचे कारण सांगून फेटाळले आहेत,तर उपोषणातून देखील काहीही निष्कर्ष निघाला नाही,आमची बाजू सत्य असल्याने आमचा विजय झाला आहे, म्हणूनच या अपयशापोटी नैराश्यातुन संस्थेची बदनामी निरंतर चालू ठेवली आहे.

यावर कमिटीने प्रकाश टाकला,पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कमिटीने मत मांडले की , सदर प्रकरणात मा. प्रांत अधिकारी , तहसीलदार यांना संस्थेचे काम थांबविण्याचे व कुठले आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याचे अधिकार नाहीत , कारण सर्व ठिकाणी फेटाळण्यात आलेल्या या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.

म्हणूनच मा.धर्मादाय आयुक्तांकडे हा विषय आहे,इतरांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ,यावर त्यांनी कागदपत्रांचे पुरावे सादर करून खुलासा केला . याबाबतीत सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून संस्थेच्या कमिटीने कर्जत पोलीस ठाण्यात ऍड.हृषीकेश जोशी व विशाल कोकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे,व कर्जत पोलीस स्टेशनने देखील त्यांना समज दिली आहे.


हुतात्मा भाई कोतवाल हे देशाला बलिदान देणारे देशाचे क्रांतीवीर आहेत म्हणूनच व्यायाम शाळेला त्यांचे स्फूर्तिदायक नाव दिलेले आहे, त्यात नाभिक समाजाचा काहीही संबंध नाही . याचे देखील त्यांनी स्पष्टीकरण केले .रितसर पैसे भरून ड सत्ता प्रकार हा अ सत्ता प्रकार झाला आहे , यासाठी न्यायालयात जाऊन दाद मागावी , मात्र यापुढे बदनामी करू नये ,असे प्रांजळ मत देखील कमिटीने व्यक्त केले .यासंबंधी आम्ही भाजप चे जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर , नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष , कर्जत अध्यक्ष यांची भेट घेऊन कायदेशीर मान्यतेचे कागदपत्रे दाखविली आहेत.

भाजप पक्षाचा व नाभिक समाजाचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले .तसेच या वादाशी बचाव समिती व कर्जतकर नागरिकांचा काहीही संबंध नाही , व्यायाम शाळा होणे इतकेच त्यांचेही म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जतमध्ये महिला मंडळ शाळा , सार्वजनिक वाचनालय , हनुमान मंदिर यांनी संस्था चालविण्यासाठी जसे इन्कम सोर्स बघितला तसेच ही संस्था व व्यायाम शाळा बांधण्यासाठी तसेच पुढे शाळा चालण्यासाठी व्यायाम शाळा बांधून झाल्यावर मिळालेल्या परवानगी नुसार गाळे बांधून त्या रक्कमेवर शाळा भविष्यात कशी चालेल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमची न्यायाची बाजू एकूण घेत नाही व मा. प्रांत अधिकारी आम्हाला बोलावत नाही , म्हणूनच ऍड .हृषीकेश जोशी दबाव तंत्राचा वापर करून बेकायदेशीरपणे सामाजिक संस्थेला त्रास देण्याचा प्रकार करत असल्याने भविष्यात इतर सामाजिक संस्था बंद होतील ,म्हणून कर्जतकरांनी आज मांडलेले सत्य जाणून घेऊन आम्हाला साथ द्यावी , असे भावनिक आवाहन देखील त्यांनी केले .व भविष्यात हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेची व कमिटीची बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करणार असून संबंधित अधिकारी वर्गांनी व्यायाम शाळेच्या बाबतीत बेकायदेशीर तथ्य नसलेले विषय घेऊन उपोषण करणा-यांवर देखील कडक कारवाई करण्याची मागणी देखील हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या कमिटीने पत्रकार परिषदेत केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page