Sunday, June 1, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड१० वी इयत्तेत मेरिट मध्ये आल्याने " कुमार राजवर्धन सुनील देशमुख "...

१० वी इयत्तेत मेरिट मध्ये आल्याने ” कुमार राजवर्धन सुनील देशमुख ” याचा ” विजय भुमी इन्व्हर्सिटी ” येथे सत्कार !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) केईएस स्कूल कर्जत शाळेत सन २०२५ मध्ये १० वी इयत्तेत पास होऊन मेरिट मध्ये आलेला विध्यार्थी ” कुमार राजवर्धन सुनील देशमुख ” याला ९०.६० टक्के मार्क मिळाले असून त्याच्यावर उत्कृष्ट मार्क मिळाल्याने कर्जत तालुक्यात तसेच शहरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कर्जत नगर परिषद हद्दीतील डेक्कन जिमखाना येथे रहात असलेले सुनील बुवा देशमुख व सौ. प्रतिभा यांचा मुलगा ” कुमार राजवर्धन ” हा खूपच हुशार , शांत व हसतमुख असे रूप मिळालेला असून शिक्षणा बरोबरच संगीत , सांस्कृतिक , धार्मिक क्षेत्रात देखील ” अव्वल ” आहे.

यावेळी ” कुमार राजवर्धन ” याला मिळालेल्या यशाबद्दल त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वडील सुनील बुवा देशमुख यांचे संगीत क्षेत्रातील गुरूवर्य ” भजन सम्राट गजानन बुवा पाटील ” यांचे सुपुत्र प्रसाद बुवा पाटील , दिलीप आंबवणे तसेच कर्जत पंचायत समितीचे निवृत्त अधिकारी पोतकुळे साहेब , यांनी घरी जाऊन कुमार राजवर्धन याचा सत्कार केला तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती ” पुंडलिक तथा बंधू जी पाटील ” यांनी दुरध्वनी वरून मंगलमय शुभेच्छा दिल्या . तसेच पळसदरी येथे राजवर्धन याचा भव्य सत्कार करण्यात आला.


विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील जामरुंग येथे राज्याबरोबरच देशात शिक्षण क्षेत्रात नावाजलेले ” विजय भुमी इन्व्हर्सिटी ” यांनी दखल घेऊन ” कुमार राजवर्धन सुनील देशमुख ” याचा प्रोफेसर यांच्याकडून ” बेस्ट लीडर ” म्हणून ” सन्मान चिन्ह व सन्मान पत्र ” देऊन सत्कार करण्यात आला , व भविष्यात शिक्षण क्षेत्रात उत्तरोत्तर गरुड भरारी घेऊन तुला ” सर्वोच्च यश ” संपादित होवो , अश्या मंगलमय शुभेच्छा दिल्या . तर आपल्या लक्षाला गवसनी घालणारा ” clever student master ” राजवर्धन याने इयत्ता १० वी मध्ये उत्तम मार्क मिळवून आपल्या शाळेचे , आपल्या गुरुजनांचे आणि त्या ही पुढे जाऊन आपल्या आई – वडिलांचे नाव रोशन केले म्हणून , त्याच्या या यशासाठी वडील सुनील बुवा देशमुख व आई सौ. प्रतिभा यांनी खूप खूप कौतुक करत यापुढे देखील ” प्रगतीचा आलेख ” असाच उंचावत राहो , अश्या शुभेच्छा दिल्या .

- Advertisment -

You cannot copy content of this page