if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेल्या अनेक वर्षांपासून ” सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ” माध्यमातून रायगड जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात संविधानिक व आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित विद्यार्थी, शोषित पिडीत लोक, कामगार तसेच वकीलकीच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देणेची भुमिका घेणारे ॲड. कैलास मोरे यांची आद. बाळासाहेब आंबेडकर , अंजलीताई आंबेडकर व महेशजी भारतीय सर यांनी ” वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ” म्हणुन निवड केली. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कोरोनाच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील अनेक शाळा, काॅलेज यांनी फी वसुली करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लुटमार सुरु ठेवली होती. त्यावेळेस ॲड. कैलास मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन हजारो विदयार्थ्यांची ” फी माफ ” करुन त्यांचे शैक्षणिक करीअर वाचवले. संपुर्ण महाराष्ट्रात ” गणवेश घोटाळा ” गाजला तो रायगड जिल्ह्यातील गणवेश घोटाळा बाहेर काढण्याचे काम ॲड . कैलास मोरे यांनी केला. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे करोडो रुपयाचे मोफत गणवेश संपुर्ण रायगड जिल्ह्यातील विदयार्थ्यांना मिळाले. ” आरटीई प्रवेशा ” बाबत सातत्याने जनजागृती करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणेसाठी तसेच आरटीई प्रवेशाची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणेचे ” श्रेय ” सुद्धा रायगडा बरोबरच कर्जत – खालापूर तालुक्यात ॲड. कैलास मोरे यांना जाते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून खालापुर तालुक्यातील अनेक कंपन्या कडुन जे कामगारांवर अन्याय केला जात होता , अशा कामगारांना न्याय देणेची भुमिका ॲड. कैलास मोरे यांनी घेतली. रायगड जिल्हयातील तसेच विशेषकरून कर्जत मधील अनेक आंदोलने, मोर्चात ॲड. कैलास मोरे यांचा सहभाग राहीला आहे. आणि आजपर्यंत असा इतिहास राहीला आहे की, ” ज्या आंदोलनात ॲड. कैलास मोरे , तिथे अपयश कधीच नाही “.ॲड. कैलास मोरे यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते पद जाहीर झालेले समजताच कर्जतकरांनी खुप मोठ्या प्रमाणात सोशिअल मिडीयावर , प्रत्यक्ष भेटून , व कॉल करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला . भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ” शिका – संघटित व्हा आणि संघर्ष करा ” या मूलभूत तत्त्वांचा वापर करून सर्व उपेक्षितांना संविधानिक मार्गाने भविष्यातही न्याय देण्याचा प्रयत्न करेन , असे मत शोषित – वंचित – पिडीत विद्यार्थी व गोरगरीब नागरिकांचे तारणहार ॲड. कैलास मोरे यांनी व्यक्त केले.