Saturday, June 28, 2025
Homeपुणेलोणावळाॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण...

ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण…

गीतेच्या १४व्या अध्यायाचे सामूहिक पठण; गीताजयंतीनिमित्त विशेष उपक्रम..

लोणावळा: येथे ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीताजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने १,००० विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या १४व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. कार्यक्रमात संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे यांनी गीतेचे जीवनातील महत्त्व सांगताना चौदाव्या अध्यायातील गुणत्रयविभाग विषयक तीन गुणांची सविस्तर ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, सदस्य संजय पुजारी, संजीव वीर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक व शशिकला तिकोणे यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता यादव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सोनाली कामे यांनी मानले. ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये दरवर्षी भगवद्गीतेतील एका अध्यायाचे विद्यार्थ्यांमार्फत वर्षभर पठण केले जाते, आणि गीताजयंतीदिनी त्याचे सामूहिक पठण आयोजित केले जाते.

- Advertisment -

You cannot copy content of this page