17 ग्रामपंचायतीच्या निधीमधून 30 गावांच्या सेवेसाठी रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा…

0
208
प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत रुजु झाली. त्यावेळी आरोग्य केंद्राच्या अध्यक्षा तसेच जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई काशिकर, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यअध्यक्ष दिपक हुलावळे,पंचायत समिती सदस्य महादू उघडे,सदस्या राजश्री संतोष राऊत यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेची पूजा करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
१४ वित्त आयोगाच्या माध्यमातुन दहीवली, औंढे, औढोली, कार्ला, वेहरगाव, मुंढावरे, टाकवे, शिलाटणे, कुसगाव, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वरसोली, कुणे, राजमाची, उधेवाडी, मळवली, कुरवंडे, बोरज, पाटण ,देवले, भाजे, सदापूर, पिंपळोली, ताजे, पाथरगाव  आशा एकुण १७ ग्रामपंचायतींच्या निधी मधुन ३० गावांसाठी ही रुग्णवाहिका देण्यातआली.
यावेळी कार्ला सोसायटीचे माजी चेअरमन किरन हुलावळे. खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, ,राष्ट्रवादी नानेमावळ अध्यक्ष राजू देवकर,वैद्यकीय अधिकारी रमेश चव्हाण,सरकारी काॕन्ट्रेक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडु,मुंढावरे सरंपच नवनाथ हेलम,उपसरपंच सागर रणपिसे,बाळासाहेब येवले,नितीन विकारी,ज्ञानेश्वर काशिकर संतोष गायकवाड,रोहिदास वाघमारें,संतोष देवकर,दिपक दळवी,विकास वायकर,गणेश तिकोणे, शिवाजी चव्हाण,प्रसाद बिराजदार,चंद्रकांत गवलवाड, अमोल थोरात  यांच्या सह रुग्णालयाचे डॉक्टर , आशा सेविका,ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.